www.24taas.com, नवी दिल्ली
‘श्रीमती सुप्रिया सुळे... आप आप भी मराठी मे बोलना चाहेंगे....‘ असं संसंदेतील अध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारताच त्यांच्या मागून एकच आवाज झाला ‘हा मराठीमेही बोलेंगे ओ...’ आणि त्यानंतर लगेचच सुप्रिया सुळेंनीदेखील मराठीत भाषण केले.
‘आज मराठी दिवस आहे, आज कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या मराठी भाषिकांना माझ्या मनापासून शुभेच्छा...’ ‘एक मराठी असल्याचा आणि मराठी मायबोलीचा मला सार्थ अभिमान आहे.’ ‘आपले दोन वरिष्ठ नेते आज येथे बसले आहेत. मिलिंद देवरा आणि श्री पाटील हे येथे आहेत. मिलिंद देवरा हे जरी मारवाडी असले तरी, त्यांची आई मराठी आहे, त्यामुळे आम्हां सगळ्यांना मराठी मातृभाषेचा अतिशय अभिमान आहे.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी संसदेत मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मात्र सुप्रिया सुळे काय बोलल्या हे इतर भाषिक खासदारांना काहीच कळलं नाही. तर मात्र त्यांनी त्याबाबत लगेचच सुप्रिया सुळेंना विचारणा केली. ‘हमे समजमे नही आया.’ असं म्हणताच सुप्रिया सुळेंनी त्यांना आपण काय बोललो हे इंग्रजीत देखील सांगितलं... तर मिलिंद देवरांच्या मागे बसलेले खासदार गावित यांनीही सुप्रिया सुळेंना आठवण करून दिली. की, मी देखील मराठी आहे.
तेव्हा सुप्रिया सुळेंनी छानसं हास्य देऊन त्यांची देखील दखल घेतली. हा हा गावित साहेब देखील आहेत, तुमची आई आणि माझी मराठी आहे. पण मिलिंद देवराची आई पण मराठी आहे... अहो आपली आई मराठी आहे पण मिलिंद देवरांची आई मराठी त्याला महत्त्वं. एका मारवाड्याची आई मराठी आहे... असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मराठीचा ठसका काय असतो हे दिल्लीतही दाखवून दिलं. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठीत भाषण केले. मला महाराष्ट्रीय असल्याचा आणि मी मराठी असल्याचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.