www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर १ रुपये ४० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहे.
गेल्या दोन आठवड्यात ही दुसऱ्यादा दर वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी, १५ फेब्रवारीला १.५० रुपयांनी पेट्रोलचे दर वाढवले होते, तर डिझेलच्या दरात ४५ पैशांची वाढ करण्यात आली होती.
या पेट्रोल दरवाढीत स्थानिक विक्री कर आणि व्हॅट समाविष्ठ नाही. त्यामुळे ग्राहकांना १.४० पेक्षा अधिक दर द्यावा लागणार आहे.
पेट्रोलचे नवे दर पुढील प्रमाणे
मुंबई – ७७.२९
नागपूर - ८०.६२
पुणे - ७७.६१
ठाणे - ७६.५९
(हे दर स्थानिक विक्रीकर आणि व्हॅट वगळून आहे)