रायगड

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल...

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल... 

Oct 20, 2017, 07:41 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

Oct 18, 2017, 10:46 AM IST

परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं

गेले चार दिवस परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं आहे. या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. त्यामुळे कापणीयोग्य झालेली भाताची रोपं आडवी झोपत आहेत.

Oct 10, 2017, 01:47 PM IST

रायगडला पावसाने झोडपले, भातशेतीचे मोठे नुकसान

 परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलंय. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालंय.  

Oct 10, 2017, 01:07 PM IST

कोजागिरी पोर्णिमा विशेष : धाडस हिरकणीचं

आज कोजागिरी पौर्णिमा.... आज उत्सव चांदण्या रात्रीचा.... पण याच कोजागिरीच्या रात्रीच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली होती..... . कोजागिरीच्या रात्रीच हिरकणी रायगडाची अवघड वाट उतरुन खाली आली.... घरी रडणा-या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंव्हांचं बळ एकवटलं..... आणि त्या दिवशीची हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली..... 

Oct 5, 2017, 06:50 PM IST

रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव गायब

रायगडमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. रायगड जिल्हायाच्या पेण तालुक्यातील मुंढाणी ग्रामपंचायतीमधील बाराशेहून अधिक मतदारांची नावं निवडणुकीच्या आधी अचानक मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे ग्रामस्थ‍ हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त होतोय.

Oct 2, 2017, 10:52 PM IST

भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.

Sep 20, 2017, 09:47 PM IST