रायगड

शिवाजी महाराजांचं ३२ मणं सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प

हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचं ३२ मण सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प किल्ले रायगडावर करण्यात आला.

Jun 4, 2017, 08:13 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

Jun 3, 2017, 07:48 PM IST

ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर

रायगड जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय .  

May 26, 2017, 06:26 PM IST

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

May 25, 2017, 10:59 PM IST

रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

May 18, 2017, 01:21 PM IST

महाड रस्ता अपघातात 3 ठार

  रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीनजीक मोटारसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक जागीच ठार झालेत.  

May 13, 2017, 09:51 AM IST

आदिवासीचे खच्चीकरण, या महिला सरपंचानी उठवला आवाज

आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्व करायला मिळते. परंतु तथाकथीत पुढारी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा अशिक्षीत आदिवासी सरपंचांचे खच्चीकरण केले जाते. रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेने याविरोधात आवाज उठविला आहे. 

May 5, 2017, 11:34 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गासाठी रास्तारोको

अलिबाग ते रेवस मार्गाची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड शारीरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी अखेर रास्तारोको केला.

Apr 29, 2017, 05:03 PM IST