लखनऊ

...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Oct 25, 2017, 08:22 AM IST

VIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती

लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.

Oct 24, 2017, 11:52 PM IST

अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sep 28, 2017, 07:42 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.  

Jul 14, 2017, 12:45 PM IST

स्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.  

Jul 14, 2017, 10:20 AM IST

लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

Jun 21, 2017, 08:24 AM IST

कोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद

एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.  

Jun 1, 2017, 06:31 PM IST

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आज करणार गृह प्रवेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊमधील कालिदास मार्ग येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आज गृह प्रवेश करणार आहेत. याविषयी त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. योगींनी पंधरा मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता बुधवारच्या शुभ मुहूर्तावर ते गृह प्रवेश करणार असल्याचे योगींच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.

Mar 29, 2017, 12:28 PM IST

मुख्यमंत्री योगींचे सरकारी कर्मचाऱ्यांना नवे आदेश

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयात नवे नियम लागू केलेत. हे नियम चांगले असल्याचे तिचा फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटवर मुख्यमंत्र्यांनी बंदी केली आहे. 

Mar 23, 2017, 12:30 PM IST

लखनऊ ऑपरेशन : 11 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.

Mar 8, 2017, 10:38 AM IST