याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती
याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.
Jun 2, 2014, 02:58 PM IST‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा
सौदी अरेबियात पाच लोकांना प्रत्येकी 39 वर्षांची कैद आणि 8000 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच की त्यांनी तीन महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत सहभाग घेतला होता.
May 11, 2014, 10:04 AM ISTप्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा
मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
May 1, 2014, 04:20 PM ISTअण्णा ज्यांना नडले, ते अडगळीत पडले...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव घोलप यांना कोर्टानं शिक्षा ठोठावलीय... त्यामुळे, आत्ताआत्तापर्यंत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या घोलपांना आता तीन वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.
Mar 21, 2014, 03:04 PM ISTलहानग्यासोबत ५० वेळेस सेक्स केल्याने महिलेला शिक्षा
लॉरेन जेव्हा १६ वर्षांची बोती, तेव्हा पहिल्यांदा तिने एका शाळेतील मुलाशी सेक्स केला, त्यानंतर लॉरेनने ५० पेक्षा जास्त वेळेस त्या मुलाशी सेक्स केला.
Mar 19, 2014, 08:04 PM ISTखबरदार! टायर जाळताय भरा २५ कोटींचा दंड!
कुठलाही प्रश्न पेटवायचा ठरला की रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचं... आंदोलन किती भडकलंय हे दाखवायला जाळपोळ करायची... आणि त्यासाठी पेटंट म्हणजे टायर जाळायचे... पण आता हे टायर जाळणं चांगलंच महागात पडणार आहे... तब्बल २५ कोटींपर्यंत दंड होणार आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांनाही ही टायर जाळणारी आंदोलनं बरीच महागात पडणार आहेत.
Feb 7, 2014, 11:43 AM IST९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!
९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.
Jan 20, 2014, 02:58 PM ISTकेवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!
२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.
Jan 1, 2014, 10:06 AM ISTकोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!
सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.
Sep 30, 2013, 01:44 PM ISTलालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!
३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.
Sep 30, 2013, 11:43 AM ISTदिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा
दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.
Sep 11, 2013, 02:22 PM ISTदिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.
Sep 11, 2013, 08:26 AM ISTदिल्ली गँगरेप: चारही आरोपी दोषी, उद्या शिक्षा सुनावणार
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.
Sep 10, 2013, 01:27 PM ISTदिल्ली गँगरेप प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता
राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चार सज्ञान आरोपींवर दिल्ली इथल्या `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला सुरू आहे.
Sep 9, 2013, 11:51 PM ISTचोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!
सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय.
Sep 8, 2013, 03:47 PM IST