ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम
नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.
Oct 7, 2012, 11:31 PM ISTराजीव गांधी यांच्या नावावर...
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.
May 20, 2012, 05:48 PM ISTसकारात्मक प्रांतवाद असावा...
दीपक पवार
राजकीय विश्लेषक
निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.
...तर अर्धी मुंबई बंद - कृपाशंकर सिंह
उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.
Nov 2, 2011, 03:52 AM ISTउद्धव-निरुपम वाद 'पोस्टर्सवर'
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुंबईतील कांदिवली भागात मध्यरात्रीच्या सुमारास शिवसैनिकांनी संजय निरुपम यांच्या पोस्टर्सला काळं फासलं.
Oct 26, 2011, 05:48 AM ISTबोरीवली तर बंद करून दाखवा
राम कदम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.
राजकारण नको, मूल्यमापन करा...
सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.
उत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'
अरविंद सावंत
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.