अवघ्या तीन मिनिटांत गाठा... सहार एअरपोर्ट!
कुर्ल्यातील ‘एमटीएनएल’ या रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे साकीनाका ते सहार एअरपोर्टपर्यंतचे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार पाडणे वाहन चालकांसाठी शक्य झाले आहे.
Jan 2, 2014, 03:22 PM ISTनवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
Nov 12, 2013, 07:50 AM ISTचला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी
अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2013, 08:15 AM ISTनवी मुंबई विमानतळाचा खर्च तिप्पटीनं वाढला
नवी मुंबईचं प्रस्तावित विमानतळाचं काम आणखी लांबणीवर पडलयं. भूसंपादन पूर्ण झालं नसल्यानं विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.
Apr 2, 2013, 04:49 PM IST'जीव्हीके'विरोधात खासगी विमान ऑपरेटर्स
मुंबई विमानतळावर पार्किंग चार्ज लावण्याच्या जीव्हीके कंपनीच्या निर्णयाविरोधात खाजगी विमान ऑपरेटर्स एकत्र आले. जीव्हीके आणि ऑपरेटर्समध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत, पार्किंग चार्जेस हजारावरून पंधरा हजार रूपये करण्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर पार्किंग चार्ज हटवण्याच्या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.
Jul 12, 2012, 06:47 PM ISTनागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग
नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि बेवारस प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे तिथं मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या क्षेत्रातल्या जाणकारांनी हा अतिशय घातक प्रकार असल्याचे म्हटले आहे.
May 9, 2012, 12:49 PM ISTभरत मुंबईत आला परत
इटलीच्या समुद्रात गेल्या शुक्रवारी बुडालेल्या 'कोस्टा कॉंकॉर्डिया' या आलिशान जहाजावर मृत्यूला हुलकावणी देऊन बचावलेले २०१ भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. या क्रुझवर 'बार टेंडर' म्हणून काम करणारे कळवा येथील भरत पैठणकर १६ सहकाऱ्यांसह मुंबई विमानतळावर दाखल झाले.
Jan 20, 2012, 12:38 PM ISTअभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड
अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
Jan 7, 2012, 02:20 PM ISTशेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत
एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.
Dec 14, 2011, 12:26 PM ISTमुंबईत पाच कोटींचे हिरे जप्त
मुंबई विमानतळावर बेल्जियमहून आयात झालेले पाच कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले आहेत.
Dec 10, 2011, 12:40 PM IST