akola

जिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला

धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.

Dec 2, 2013, 01:23 PM IST

धुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.

Dec 1, 2013, 10:15 AM IST

`आदर्श` शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थीनीचा विनयभंग

अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न एका नराधम शिक्षकाने केलाय. चंदू गोतरकर असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला `आदर्श` पुरस्कार मिळाला आहे. त्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय.

Aug 10, 2013, 12:16 PM IST

अकोला गोयंका डेंटल विद्यार्थ्यांना अखेर न्याय

अकोल्यातील जमनालाल गोयंका डेंटल कॉलेज अँण्ड हॉस्पिटल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. याबाबत झी २४ तासने आवाज उठवला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झी २४ तासने प्रकरण लावून धरले होते.

May 28, 2013, 07:20 AM IST

हत्येनंतर फरार मनसे नगरसेवकाला अखेर बेड्या!

अकोला महापालिकेचे मनसेचे नगरसेवक राजेश काळे याला अखेर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय. कार्तिक जोशी हत्येप्रकरणी राजेश काळे पाच दिवसांपासून फरार होता.

May 25, 2013, 11:14 PM IST

शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने भाचीलाच पेटविले

अकोल्यात धक्कादायक घटना घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Mar 18, 2013, 03:17 PM IST

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!

अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.

Mar 1, 2013, 02:09 PM IST

अकोल्यात संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या

नागपूरनंतर आता अकोल्यात संतप्त जमावाकडून युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घ़डलीय. गरबा रास खेळणा-या महिलांची छेड काढल्यानं संतप्त जमावान योगेश चव्हाण या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाला संतप्त जमावानं जबर मारहाण केल्यानं यात त्याचा मृत्यू झाला.

Oct 22, 2012, 06:32 PM IST

रॅम्पवर आल्या बैलगाड्या अन्...

रॅम्पवॉक म्हटला की डोळ्यासमोर येतात त्या लचकत मुरडत चालणाऱ्या मॉडेल्स... विविधरंगी प्रकाशझोतात रंगून गेलेला रॅम्प... मात्र या साऱ्या गोष्टींना छेद देणारा आणि तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जाईल, असा फॅशन शो रंगला तो अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये...

Sep 13, 2012, 01:40 PM IST

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

Jun 27, 2012, 10:44 AM IST

असं उभाराल ‘मडकं सिंचन’...

अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय.

Jun 22, 2012, 09:53 AM IST

अकोल्यात मुख्यमंत्र्यांची गाडी रोखली

अकोल्यात आज मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषदेच्या समारोपाला आले होते.

May 31, 2012, 12:41 PM IST

अकोला बनलंय अवैध औषधविक्रीचं केंद्र

अकोल्यात ऑक्सिटोसीनच्या ७७ हजार इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. दुधाळ जनावरांना पान्हवण्यासाठी हे औषध वापरण्यात येतं. या औषधाच्या विक्रीला बंदी असतानाही त्याची बाजारात खुलेआम विक्री सुरु आहे.

May 28, 2012, 10:27 PM IST

राष्ट्रवादीच्या गटनेत्यावर भरदिवसा गोळीबार

अकोल्याच्या गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात अजय रामटेके या महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात इसमांनी रामटेके यांच्यावर गोळीबार केला.

May 28, 2012, 07:05 PM IST

पाण्यावरुन अकोला महापालिकेत रणकंदन

पाणी टंचाईचे तीव्र पडसाद अकोला महापालिकेत उमटलेत. पाणी टंचाईवर बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करण्याऐवजी गोंधळच घातला.

May 16, 2012, 05:29 PM IST