राजकारण... घाणीची दलदल - अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अण्णांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
Sep 30, 2012, 06:02 PM IST‘राजकारणात... पण, सत्तेसाठी नव्हे ’
अरविंद केजरीवाल यांनी आपण राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय आणि यासंदर्भातच गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबर रोजी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
Sep 25, 2012, 12:43 PM ISTलवकरच पुन्हा एकत्र येऊ- केजरीवाल
अण्णांपासून दूरावलेल्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आणि आपण लवकरच पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना अण्णांनी त्यांचा फोटो किंवा नाव वापरण्याला बंदी घातली आहे. दोघांमधले संबंध टोकाचे दुरावलेत. मात्र, तरीही अण्णा आणि आपण येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद केजरीवाल यांना वाटतोय.
Sep 24, 2012, 08:00 AM ISTअण्णांच्या निर्णयानं केजरीवालांना धक्का
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना अण्णांच्या कालच्या वक्तव्यामुळे धक्का बसलाय.
Sep 20, 2012, 12:30 PM IST`असीमला सोडा नाहीतर ठिय्या आंदोलन`
अटकेत असलेले व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिलाय.
Sep 11, 2012, 02:12 PM ISTपार्टीचा निर्णय अण्णांचाच - केजरीवाल
राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय अण्णा हजारेंचा होता, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय. अण्णांनी जर सांगितलं तर आम्ही माघार घ्यायला तयार असल्याचंही केजरीवालांनी ट्विटरवर सांगितलंय.
Aug 12, 2012, 06:49 PM ISTअण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'
टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.
Aug 6, 2012, 02:42 PM ISTअण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'
अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.
Aug 2, 2012, 05:43 PM IST'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'
टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
Aug 2, 2012, 01:57 PM ISTआत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.
Aug 1, 2012, 04:39 PM ISTअण्णा आले, गर्दीही आली!
जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.
Jul 29, 2012, 12:34 PM ISTअण्णा आजपासून बसणार उपोषणाला...
अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.
Jul 29, 2012, 09:48 AM ISTगर्दी नको तर दर्दी हवेत - अण्णा हजारे
अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
Jul 28, 2012, 02:20 PM IST'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM IST