assembly 2014

ऑडिट - जळगाव जिल्ह्याचं

जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.

Oct 7, 2014, 08:54 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - मुक्ताईनगर

ऑडिट जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरचं. म्हणजे अर्थातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाचं.

Oct 7, 2014, 08:51 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव शहर

जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणूका मात्र जिंकल्यात. जैन यांच्या यशाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे? आगामी निवडणुकीत जैन यांना कुणाचं आव्हान असणारे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणा-या जैन यांची जनतेशी नाळ राहिलीय की तुटलीयं?

Oct 7, 2014, 08:47 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव ग्रामीण

घरकुल घोटाळाप्रकरणी जळगावचे राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर जळगाव ग्रामीण या त्यांच्या मतदार संघात त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी मतदार संघाची धुरा हाती घेतली आहे.

Oct 7, 2014, 08:44 PM IST

ऑडिट - परभणी (लोकसभा मतदारसंघाचं)

संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.

Oct 7, 2014, 08:39 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गंगाखेड

विस्थापितांना आव्हान देत सिताराम घनदाट यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यशाचा गंगाखेड पॅटर्न...काय असतो याचा चमत्कार आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेडमध्ये दाखवून दिलाय. चार दिवसांपूर्वी मतदारांना लुभावण्यासाठी पैसे वाटण्याच्या आरोपाखाली घटनाट यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला.

Oct 7, 2014, 08:36 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसमत

शिवसेनेच्या एकेकाळच्या या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रवादीने कब्जा मिळवलाय. मात्र या मतदारसंघात जनता कुणाच्या बाजूने ऐनवेळी कौल देते हे सांगणं तसं कठीणच.

Oct 7, 2014, 08:27 PM IST

विकासाचे मुद्दे गायब, भावनिक मुद्द्यांवर भर

विकासाचे मुद्दे गायब, भावनिक मुद्द्यांवर भर

Oct 7, 2014, 08:19 PM IST

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक... 

Oct 7, 2014, 08:18 PM IST

राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला

पंतप्रधान मोदी हे इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत, असा नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मोदी सकाळी लवकर उठतात, आणि अकरा वाजता सभा घेतात असं सांगून राज ठाकरे यांच्यावर  तोफ डागली आहे.

Oct 7, 2014, 08:15 PM IST

अफजल खानासोबत सत्तेत कशासाठी? - भाजपचा सेनेला सवाल

अफजल खानासोबत सत्तेत कशासाठी? - भाजपचा सेनेला सवाल

Oct 7, 2014, 07:54 PM IST

ऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)

बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच  होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.

Oct 7, 2014, 07:27 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आष्टी

आता ऑडिट बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचं. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या सुरेश धस यांचा हा मतदारसंघ.

Oct 7, 2014, 07:23 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बीड

बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात. 

Oct 7, 2014, 07:16 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी

परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.  

Oct 7, 2014, 07:12 PM IST