bharatiya janata party

केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

Nov 2, 2015, 06:43 PM IST

केडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे

राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

Nov 2, 2015, 06:34 PM IST

निवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज

कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Nov 2, 2015, 05:52 PM IST

मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट

एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे. 

Nov 2, 2015, 05:12 PM IST

मनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक

 

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला आहे. 

केडीएमसी हा तर ट्रेलर आहे, मुंबई-ठाणेचा पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात शिवसैनिकांनी केडीएमसी विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 2, 2015, 04:48 PM IST

शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.

Nov 2, 2015, 04:25 PM IST

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.

Nov 2, 2015, 03:35 PM IST

...तर कल्याणमध्ये सत्तेच्या चाव्या मनसेकडे ?

कल्याण डोंबिवलीचे सर्व निकाल हाती आले असून यात कोणत्याही पक्षाला बहूमत मिळालेले नाहीत. शिवसेना 52 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला आहे तरी संपूर्ण बहूमत मिळविण्यात अपयश मिळाले आहे.

Nov 2, 2015, 03:23 PM IST

राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

Nov 2, 2015, 03:17 PM IST

कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Nov 2, 2015, 02:38 PM IST

केडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी

कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.

Nov 2, 2015, 02:37 PM IST

उद्धव ठाकरे कल्याण- डोंबिवलीला जाणार

 कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण येथे जाणार आहे. 

Nov 2, 2015, 02:36 PM IST