रेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको
रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.
May 28, 2014, 05:10 PM IST‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट
अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.
Apr 24, 2014, 10:47 PM ISTइथं उन्नावचा खजिना नाही... पण तरीही सर्व काही सोन्यासाठी!
उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.
Apr 6, 2014, 03:58 PM ISTचिमुकल्यांमध्ये व्हिटॅमिन `ए`ची कमतरता हानिकारक
`मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मिशिगन यूनिव्हर्सिटी`च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली. प्रयोगात केलेल्या निरिक्षणाद्वारे हे सिद्ध झालंय की, ज्या मुलांच्या आहारात व्हिटॅमिन `ए`चे प्रमाण कमी आहे, त्या मुलांना उलट्या, जुलाब, सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
Feb 11, 2014, 05:42 PM ISTगोव्यात ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध ?
गोव्यात धक्कादायक सत्य उघड झाले आहे. गोव्यातील बिचवर ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होतात, अशा दावा ‘बागा बिच’चे निर्माता प्रमोद साळगावकर यांनी केला आहे.
Nov 27, 2013, 01:11 PM ISTकामगार-सुरक्षारक्षकांच्या मुलांसाठी मोफत लॅपटॉप!
निवडणुका जवळ येऊ लागल्याने लोकप्रिय योजना आणि घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय. एकीकडे कामगारांना रोजगार देण्याची मारामार असताना, कामगारांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या मुलांना मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट देण्याची योजना राज्याच्या कामगार विभागाने आखलीय.
Nov 9, 2013, 03:09 PM IST<B> चिमुरड्यांच्या डोळ्यासमोर फुटला सुतळी बॉम्ब! </b>
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.
Nov 6, 2013, 04:38 PM ISTदिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!
दिवाळीत किल्ला बनविणे हे लहानग्यांचे आवडीचे काम... मातीत खेळत धमाल मस्ती करत दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमुची धडपड सध्या सगळीकडचं सुरु आहे. अशीच धडपत सध्या कोल्हापूर शहरातील पेठा पेठात पहायला मिळत आहे. धगधगत्या इतीहासाची साक्ष देणाऱ्या शिवरायांचे रायगड, प्रतापगड, रागंणा,पन्हाळगड असे अनेक किल्ले लवकर उभे राहावते यासाठी सगळे मावळे कामाला लागले आहेत.
Oct 31, 2013, 09:05 AM ISTफेसबुकने अल्पवयीन मुलांवरील उठविले निर्बंध
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
Oct 18, 2013, 03:23 PM ISTदर ५ मुलांमागे एका मुलाशी होतोय असभ्य व्यवहार
नुकत्याच झालेल्या एनएसपीसीसीच्या एका सर्वेक्षणातून दर ५ मुलांमागे एक मुलगा इंटरनेटवर धमकी, अश्लील संदेश, अर्वाच्य भाषा यांची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.
Aug 12, 2013, 06:10 PM ISTसहाव्या वर्षीच मुले पाहतायेत... `पॉर्न साईट`
लहान मुलं सध्या भलतीच टेक्नोसॅव्ही झाली आहेत. फार कमी वयात त्यांना सहज उपलब्ध असणारी मनोरंजनाची इंटरनेट सारखी साधने यामुळे त्याचे परिणामही आता दिसून येत आहेत.
May 18, 2013, 02:28 PM ISTआक्सा बीचवर चार मुले बुडालीत
मौज मजा करण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मुलांवर काळाने घाला घातला. मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडालीत. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आलेय. चक एकाचा मृतदेह सापडला दोघे जण बेपत्ता आहेत.
May 5, 2013, 03:35 PM ISTस्मरणशक्ती : योग्य आहाराची गरज
लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.
Mar 19, 2012, 03:01 PM ISTओह 'माय' गॉड !
अफगाणिस्तानमधल्या एका महिलेनं एका वेळी सहा बाळांना जन्म दिलाय. २२ वर्षांची सार गुल हिनं तीन मुलगे आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. डिलिव्हरीनंतर सहाही मुलांची तब्येत उत्तम आहे.
Jan 27, 2012, 09:44 PM ISTमुलं सोपवण्यास नॉर्वे सरकार तयार
नॉर्वे सरकार आता भारतीय मुलांना पुन्हा सोपवण्यास तयार झलं आहे. नॉर्वे कोर्टाबाहेर भारतीय मुलांना परत करण्यासंबंधी करार झाला आहे. नॉर्वे सरकारने भारतीय जोडप्याच्या मुलांना परत सोपावण्याच्या विदेश मंत्री एस एम कृष्णा यांच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे
Jan 26, 2012, 09:46 AM IST