controversial statement

'बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात'

वर्तमान पत्रात बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात, असं धक्कादायक वक्तव्य महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. 

Feb 1, 2016, 01:37 PM IST

प्रोफेसरचं गैर-मुस्लिम महिला, अल्लाहविषयी वादग्रस्त वक्तव्य

एका मुस्लिम महिला प्रोफेसरने अल्लाह आणि गैर मुस्लिम महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका व्हिडीओत या महिला प्रोफेसरने म्हटलं आहे, "अल्लाहने मुस्लिम पुरूषांना गैर-मुस्लिम महिलांचा अपमान करण्यासाठी, त्यांच्यासोबत बलात्कार करण्याची परवानगी दिली आहे."

Jan 18, 2016, 03:01 PM IST

राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी

जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

Sep 10, 2015, 11:33 AM IST

सीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य

 अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Dec 11, 2014, 03:22 PM IST

वैश्यावृत्ती वैध करायला हवं, महिला धर्मगुरुंचं मत

‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय. 

Oct 16, 2014, 11:13 AM IST

`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Apr 7, 2014, 10:34 PM IST

महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी

महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतोय, असं आशा मिर्गे यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2014, 08:51 PM IST

महिला आयोग सदस्यांचं वादग्रस्त वक्तव्य

महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी महिलांविषयी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे तसेच वागणं आणि अयोग्य ठिकाणी जाणं या तीन गोष्टी करणीभूत असतात, असं वादग्रस्त वक्तव्य आशा मिर्गे यांनी केलं आहे.

Jan 28, 2014, 04:51 PM IST