'केरळमधील एका तरुणाला तुम्ही...,' भारतीय संघात स्थान मिळण्याबद्दल संजू सॅमसन स्पष्टच बोलला
IPL 2024: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने भारतीय संघात स्थान मिळवणं किती कठीण आहे यावर भाष्य केलं आहे. तसंच आगामी आयपीएल स्पर्धेवरही भावना व्यक्त केल्या.
Mar 20, 2024, 06:22 PM IST
IPL 2024: गौतम गंभीरने 'Greatest Team Man' म्हणून 'या' खेळाडूचं घेतलं नाव; तो धोनी किंवा सचिन नाही
IPL 2024: गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआर संघात दाखल झाला असून, मेंटॉरची भूमिका निभावताना दिसणार आहे. दरम्यान नुकतंच एका कार्यक्रमात त्याने आपल्या भावना व्यक्त करताना त्याला वाटलेला सर्वोत्तम सांघिक खेळाडू कोण आहे याचा खुलासा केला.
Mar 20, 2024, 03:33 PM IST
'IPL मध्ये मी एका दिवसाला 25 लाख कमावत होतो,' नवज्योत सिंग सिद्धू यांचा मोठा खुलासा, 'मी पैशांसाठी...'
IPL 2024: राजकारणामुळे क्रिकेटपासून दूर गेलेले माजी क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. आयपीएलमध्ये ते पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहेत. आपला वेगळा अंदाज आणि शायरी यामुळे क्रिकेचाहत्यांना त्यांचं समालोचन फार भावतं.
Mar 19, 2024, 07:18 PM IST
'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2024, 03:28 PM IST
'मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला...,' हार्दिक पांड्याचा उल्लेख करत माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, 'रोहित शर्मामुळे...'
IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संधी दिली आहे.
Mar 15, 2024, 02:39 PM IST
'ऐन तारुण्यात 20 व्या वर्षी कोण ऐकतं?,' यशस्वी जैसवालने ऐकला नाही गावसकरांचा सल्ला; म्हणाले 'तो विसरला की...'
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत यशस्वी जैसवाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैसवालने 5 सामन्यात 712 धावा केल्या आहेत.
Mar 14, 2024, 04:12 PM IST
'...हा परत कार चालवायला निघून जाईल,' नेटकऱ्याच्या कमेंटवर ऋषभ पंतने एका इमोजीत दिलं उत्तर
भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. पण अखेर आता तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
Mar 13, 2024, 05:20 PM IST
'हा काय करतोय,' सुनील गावसकर संतापल्यानंतर सरफराज खानने मागितली माफी, म्हणाला 'पुन्हा कधी...'
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटर सरफराज खानला दोन अंकी धावसंख्या तीन अंकात रुपांतरित करण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली.
Mar 13, 2024, 04:30 PM IST
'मी अक्षर पटेलचा आदर करतो, पण...', राहुल द्रविडने 'व्हीव्हीएस लक्ष्मण'चा उल्लेख करत दिलं उत्तर, 'जर तुम्हाला...'
Rahul Dravid on Axar Patel: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघात अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याऐवजी कुलदीप यादवला घेण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्याने भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही उल्लेख केला.
Mar 12, 2024, 11:34 AM IST
'जर तुम्हाला...', BCCI-स्थानिक क्रिकेट वादावर रोहितने स्पष्ट केली भूमिका; 'हेच मूळ आहे'
India vs England Test: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय विरुद्ध स्थानिक क्रिकेट असा वाद रंगला आहे. जर खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळले नाहीत तर त्यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार केला जाणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यातच आता कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Mar 6, 2024, 03:31 PM IST
'यशस्वीच्या फलंदाजीचं श्रेय आम्हाला मिळायला हवं', इंग्लंडच्या खेळाडूला रोहित शर्माने दिलं उत्तर; 'कदाचित ऋषभ पंतला...'
India vs England: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला सणसणीत उत्तर दिलं आहे. बेन डकेटने यशस्वी जैसवाल लगावत असलेल्या षटकारांचं श्रेय इंग्लंडला दिलं पाहिजे असं म्हटलं होतं.
Mar 6, 2024, 02:12 PM IST
'आम्हीही पैसे कमावले, पण अशा पद्धतीने नाही,' माजी खेळाडूने ईशान किशन, श्रेयस अय्यरला सुनावलं
बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्याने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर चर्चेत आहेत. स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करत असल्याने बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे. यानंतर अनेक माजी खेळाडू व्यक्त होत असून आपलं मत मांडत आहेत.
Mar 4, 2024, 05:13 PM IST
Viral Video: 'अरे हा तर लगानमधला लाखा निघाला,' खेळाडूने आपल्या संघाविरोधात केली फिल्डिंग; नेटकरी सैराट
सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातल एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना गोंधळ घातला.
Mar 4, 2024, 02:50 PM IST
विराटची हकालपट्टी करुन रोहितला कर्णधार का केलं? सौरव गांगुलीने अखेर केला खुलासा, 'मला अजिबात...'
विराट कोहली कसोटी आणि टी-20 च्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. विराटने त्यावेळी केलेल्या काही आरोप तसंच विधानांवरुन मोठा गदारोळ झाला होता.
Mar 3, 2024, 06:47 PM IST
IPL: गुजरात टायटन्सला धक्का! 3.60 कोटींच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात; बाईकचा चेंदामेंदा
झारखंडमधील उद्योन्मुख खेळाडू रॉबिन मिंझ आयपीएल लिलावामुळे चर्चेत आला होता. गुजरातने त्याला 3 कोटी 60 लाखात खरेदी केलं आहे. दरम्यान, नुकताच त्याचा अपघात झाला असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे.
Mar 3, 2024, 04:57 PM IST