defence minister

निर्मला सीतारमन बनल्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री

केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.

Sep 3, 2017, 02:31 PM IST

चीनला संरक्षण मंत्री अरूण जेटलींचं उत्तर

चीनने भारत-चीन दरम्यान झालेल्या १९६२ च्या युद्धाचा उल्लेख करताना म्हटलं आहे, भारताला यापासून धडा घेण्याची गरज आहे. 

Jun 30, 2017, 08:49 PM IST

भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

May 1, 2017, 08:58 PM IST

मनोहर पर्रिकरांनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकाळी सव्वा सातच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावलाय. 

Feb 4, 2017, 08:05 AM IST

'कारवाई थांबवण्याची पाकिस्तानची विनंती'

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे.

Nov 26, 2016, 08:25 PM IST

पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय

विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या. 

Nov 3, 2016, 09:24 AM IST

'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...

भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?

Oct 6, 2016, 07:26 PM IST

मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.

Oct 6, 2016, 03:53 PM IST

काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही उरीमध्ये सुरक्षेत काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली दिली आहे. काहीतरी चूक घडली आहे, हे उघडच आहे इतकंच पर्रीकर म्हणाले. 

Sep 22, 2016, 05:34 PM IST

नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती लिक

नौदलाच्या स्कॉर्पिन या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती फुटल्याची पुढे आली आहे. 

Aug 24, 2016, 04:59 PM IST

पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे - पर्रिकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानावर टीका केल्यानंतर आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे अशा तिखट शब्दात त्यांनी पाकिस्तावर टीका केली.

Aug 16, 2016, 02:14 PM IST