पोलिसांचं निलंबन, तरीही मार्डची संपाची भूमिका कायम
सोलापूरमध्ये निवासी डॉक्टराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड बेमुदत संपावर गेलीय. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन केलं असलं तरी मार्डने संपाची भूमिका कायम ठेवलीय.
Jan 3, 2014, 11:16 AM ISTडॉक्टरांना मारहाण प्रकरणी तीन पोलीस निलंबित
सोलापूरमधील निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.
Jan 2, 2014, 02:31 PM ISTनायर हॉस्पीटलच्या डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.
Dec 31, 2013, 02:50 PM ISTचेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!
मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.
Dec 25, 2013, 08:41 PM ISTफ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!
जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
Dec 23, 2013, 09:20 AM ISTलेडीज बाथरूममध्ये चोरून क्लिप काढणारा डॉक्टर अटकेत
बॉम्बे रुग्णालयाच्या बाथरूममध्ये दडून शिकाऊ महिला डॉक्टरांच्या व्हिडीओ क्लिप काढणाऱ्या डॉक्टरला आझाद मैदान पोलिसांनी गजाआड केले. यश शहा असे या डॉक्टरचे नाव असून, तो बॉम्बे रुग्णालयात ऑर्थोपेडिक्स विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
Dec 19, 2013, 09:06 PM ISTधक्कादायक: ओव्हर टेक करु दिलं नाही म्हणून डॉक्टरची हत्या
आजपर्यंत अनेक लहान मोठ्या कारणांवरुन हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील पण ओव्हर टेक सारख्या शुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या कुणी करेल का? होय ओव्हर टेक करु दिला नाही म्हणून कल्याणमध्ये एका डॉक्टराची हत्या करण्यात आलीय.
Dec 15, 2013, 09:46 PM ISTएमबीबीएस आणि बीयूएमएस डॉक्टर पाहिजे
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या एमईएमएस विभागाअंतर्गत मेडिकल ऑफिसर म्हणून मुंबई आणि ठाणे येथे ३४० जागांसाठी वॉक इन इंटरव्ह्यू आहे.
Dec 7, 2013, 11:52 AM ISTडॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
Dec 3, 2013, 12:54 PM ISTरात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?
पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.
Nov 17, 2013, 10:20 PM ISTहाय प्रोफाईल मुन्नाभाई, चक्क पवारांपासून पतंगरावपर्यंतचे मोबाईल नंबर
अमित जगन्नाथ कांबळे उर्फ मुन्नाभाई एम बी बी एस. पुण्यातला या चोवीस वर्षीय बोगस डॉक्टरनं अनेकांना फसवलंय. यासाठी तो पुण्यातील विवीध रूग्णालयात फोन करून नवीन दाखल झालेल्या रूग्णाची माहिती घ्यायचा. त्यानंतर स्वतः किडनितज्ज्ञ असल्याचं रूग्णाच्या नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
Nov 13, 2013, 08:04 AM ISTमॉडेलचा डॉक्टरवर लैंगिक शोषणाचा आरोप, केली दगडफेक!
मुंबईतील अंधेरी येथे शिखा जोशी नामक होतकरू मॉडेलने एका कॉस्मेटिक सर्जनच्या घरावर दगडफेक केली होती. ३० ऑक्टोबर रोजी तिने आणि तिच्या भावाने सर्जनच्या घरावर दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Nov 10, 2013, 02:32 PM ISTमुलुंडमध्ये खासगी रुग्णालयाला आग, डॉक्टरचा मृत्यू
मुलुंडमध्ये गोकुळ नावाच्या खाजगी रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झालाय. राहुल रुद्रवार असं मृत डॉक्टरचं नाव आहे.
Nov 7, 2013, 12:53 PM ISTयांच्या आयुष्यात दिवाळी कधी?
जळगाव जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त एचआयव्हीबाधित मुलं आहेत. यापैकी २८ चिमुरड्यांना जळगावमधल्याचं एका डॉक्टरांनी दत्तक घेतलंय. प्रभावशाली उपचार व्हावा यासाठी या मुलांच्या पोषण आहाराचा खर्च हे डॉक्टर उचलणार आहेत. मात्र उर्वरित शेकडो मुलांच्या आहाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
Nov 2, 2013, 12:50 PM ISTनाशिकमध्ये मनसेचं ‘डॉक्टर’स्टाईल आंदोलन
डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.
Oct 22, 2013, 11:21 AM IST