मोदींचा काँग्रेसला दे धक्का, प्रवक्ताच भाजपमध्ये!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरला राजकीय कारणाने आलो नसल्याचे सांगितले असले तरी काँग्रेसला धक्का देण्यासाठी त्यांनी संघ श्रेष्ठींची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 22, 2012, 04:39 PM ISTमोदींच्या बिहारविरोधाची ठाकरेंकडून प्रशंसा
पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा अग्रलेखात म्हटले आहे.
Oct 20, 2012, 06:55 PM ISTमोदींनी केला सोनियांवर पलटवार!
गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-यांचा राजकोटमध्येच पराभव होईल, असा घणाघात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदींनी काँग्रेसवर केलाय. काँग्रेस विकासाच्या मुद्यावर खोटं बोलत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केलाय.
Oct 4, 2012, 05:23 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 3, 2012, 04:28 PM ISTमृत्यूचं उड्डाण...
आकाशात घडला तो थरार!
काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
हवेत झाली दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर!
काही मिनिटात जळून खाक झाले हेलिकॉप्टर|
भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील धक्कादायक घटना!
एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ जण ठार
गुजरातच्या जामनगर भागात आज एअरफोर्सच्या सरावादरम्यान भयंकर अशी दुर्घटना घडलीय. एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत तर दोन जण जखमी झालेत.
Aug 30, 2012, 02:27 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM ISTकेशुभाई पटेलांचा राजीनामा, मोदींना झटका
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री कांशीराम राणा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुले भाजपला जोरदार झटका बसला आहे. पटेल हे पक्ष काढण्याच्या स्थितीत आहेत.
Aug 4, 2012, 09:07 PM ISTगुजरातमधील अपघात २४ ठार
सानंद-विरामगाम महामार्गावर आज गुरुवारी ट्रक अपघातात आठ बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील १५ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Jun 14, 2012, 03:03 PM ISTगोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप
गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 12, 2012, 02:11 PM ISTगुजरात विधानसभेत 'डर्टी पिक्चर'!
कर्नाटक विधानसभेत अश्लील चित्रफित पाहणाऱ्या तीन मंत्र्यांना सत्तेची खूर्ची सोडावी लागली होती. आता गुजरात सरकारमधील आमदारांनी कर्नाटकचा 'पोर्नगेट'चा कित्ता गिरवला आहे. विशेषबाब म्हणजे सभ्य समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदारांचा यात समावेश आहे. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.
Mar 21, 2012, 06:44 PM ISTगोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.
Feb 28, 2012, 01:11 PM ISTगोध्रा हत्याकांडाला दहा वर्षं पूर्ण
गुजरातमधल्या गोध्रा हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 27, 2012, 01:10 PM ISTगुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Feb 24, 2012, 11:40 AM ISTचीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद
चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.
Feb 9, 2012, 05:11 PM IST