सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
Oct 30, 2013, 09:08 AM ISTरांचीमध्ये धोनीच्या घरावर दगडफेक!
टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.
Oct 24, 2013, 10:50 AM ISTभारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये १-२ नं पिछाडीवर आहे. मॅचममध्ये भारताला कमकबॅकचं आव्हान असणार आहे. रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे सा-यांचच लक्ष असणार आहे.
Oct 23, 2013, 08:59 AM ISTरांची वनडेमध्ये भारतावर दबाव
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये 1-2 नं पिछाडीवर आहे.
Oct 22, 2013, 09:13 PM IST… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.
Oct 20, 2013, 01:41 PM ISTधोनीनं कमावलं, ईशांतनं गमावलं!
बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळं तिसऱ्या मोहाली वन-डेमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला. धोनीची सेंच्युरी आणि कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं कांगारुंसमोर ३०४ रन्सचं आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्स कांगारुंच्या बॅट्समनला वेसण घालण्यात अपयशी ठरले. यामुळंच टीम इंडियाला तिसऱ्या वन-डेमध्ये ४ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली.
Oct 20, 2013, 08:42 AM ISTकांगारूंच्या पुन्हा धुलाईसाठी टीम इंडिया सज्ज!
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहालीत तिसरी वन-डे खेळली जाणार आहे. जयपूर वन-डेमध्ये ज्याप्रमाणे कांगारुंच्या बॉलर्सची धुलाई केली होती तशीच धुलाई मोहाली वन-डेमध्येही भारतीय बॅट्समनने करावी अशीच इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.
Oct 18, 2013, 06:38 PM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM ISTभारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
Oct 10, 2013, 10:26 AM ISTइंडिया- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
Oct 9, 2013, 11:53 PM ISTवेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...
Oct 9, 2013, 04:47 PM IST`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`
भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.
Oct 9, 2013, 04:25 PM ISTभारताकडून ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
दिनेश कार्तिकचे दमदार शतक (146) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे तडाखेबंद 91 धावांच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर 243 धावांनी मात केली.
Jun 4, 2013, 10:14 PM ISTधोनीने धुतले, कार्तिकने कुटले!
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jun 4, 2013, 07:37 PM ISTसचिनने वाटेल तेवढं खेळावं - गांगुली
सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
Mar 25, 2013, 10:57 AM IST