मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच, भाज्या महागल्या
मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाडा मात्र अजूनही पावसाची वाटच पाहतोय. पावसानं मारलेली दडी, पाण्याची टंचाई आणि भाज्यांच्या लागवडीत झालेली घट यामुळे भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. गेल्या महिनाभरात भाज्यांचे भाव दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत.
Jun 28, 2012, 09:12 AM ISTअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न
डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, रुपयाची घसरण आणि महागाई अशा वातावरणात विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. काही महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडोअरचाही समावेश आहे.
Jun 7, 2012, 08:27 AM ISTरुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. रुपयानं आतापर्यंतचा सर्वात मोठा निचांक गाठलाय. आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत 55.68 रुपयांवर गेली आहे. रुपयाच्या घसरणीचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून घरणारा रुपयाचा महागाईवर परिणाम होणार आहे.
May 23, 2012, 12:50 PM ISTदूध महागलं, बजेट कोलमडलं
वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.
Mar 31, 2012, 05:29 PM ISTथंडीचा कडाका, आंब्याला तडाखा
अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.
Mar 13, 2012, 08:13 AM ISTभाज्यांचे भाव कडाडले
उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.
Mar 3, 2012, 06:20 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTदिवाळीच्या तोंडावर महागाईचा 'फटाका बॉम्ब'
ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचे फटाके फुटत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील महागाईने उच्चांक गाठला आहे.
Oct 21, 2011, 03:53 AM IST