israel

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Jul 4, 2017, 09:12 AM IST

इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत.

Jul 3, 2017, 10:56 PM IST

मराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!

भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.

Apr 1, 2017, 04:08 PM IST

इस्त्राईलचे राष्ट्रपती शिमोन पेरिस यांचे निधन

इस्त्राईलचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान शिमोन पेरिस यांचं आज वयाच्या 93 व्या वर्षी तेल अव्हिवमध्ये निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

Sep 28, 2016, 12:55 PM IST

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पाळीव कुत्र्याला चावा घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान बेंजामिन यांनी स्वत: याची माहिती दिलीये.  बेंजामिन यांनी हन्नुकाह सणाच्या निमित्ताने निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांच्या कुत्र्याने लिकुड पार्टीचे खासदार शरीन हॉक्सेल यांचा चावा घेतला. 

Dec 13, 2015, 12:42 PM IST

शॉकिंग व्हिडिओ: फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला मारला चाकू नंतर...

एक खूप शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. यात एका फिलिस्तिनी महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकाला अचानक चाकू मारला. ही घटना वेस्ट येरूशेलमध्ये घडली. यानंतर पीडित महिलेला गोळी मारण्यात आली. महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि सुरक्षा रक्षकही चाकू हल्ल्यात जखमी झालाय.

Nov 9, 2015, 03:10 PM IST

'झी २४ तास' इस्राईलमध्ये : समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'

समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'

Aug 28, 2015, 03:20 PM IST

इसिसच्या 10 वर्षीय मुलानं मारली इस्रायली तरुणाला गोळी

आत्तापर्यंत पत्रकार, सैनिकांची हत्या करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेनं इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत एका तरूणाची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचा वापर केला आहे. 

Mar 11, 2015, 12:42 PM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST