jitendra awhad

'जितेंद्र आव्हाडांची नौटंकी'

दहीहंडीसारख्या सणांवर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड कोर्टात आव्हान देणार आहेत. तर दुसरीकडे आव्हाडांची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

Sep 1, 2015, 07:56 PM IST

दुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 20, 2015, 05:59 PM IST

ठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

Aug 10, 2015, 09:05 PM IST

'तेलगी'वरून अजितदादांनी जितेंद्र आव्हांडाना झापले...

तेलगीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सभागृहात तेलगीचा उल्लेख केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले. 

Jul 23, 2015, 08:12 PM IST

'भारत सरकारला दहशतवाद्यांना मारण्यासाठी दहशतवादी पाहिजेत'

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संरक्षण मंत्र्यांच्या अतिरेक्यांना मारण्याच्या विधानाचा विरोध केला आहे. त्यासाठी त्यानी अनोखा मार्ग अवलंबला आहे. आव्हाड यांनी ठाण्यात होर्डिंग लावून त्यांच्या या विधानाचा विरोध केला आहे.

May 24, 2015, 02:22 PM IST

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना धमकी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या येत असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर आता तिसरा कोणाचा क्रमांक लागणार, असा सवाल  धनंजय मुंडे यांनी रविवारी सरकारला केला.

Mar 9, 2015, 01:50 PM IST

'बोगस बोंब मारायला आमचा 'बळीराजा' कुबेर नाही' - आव्हाड

'बळीराजाची बोगस बोंब' या नावाचा अग्रलेख लिहून तमाम शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या एका  वृत्तपत्राच्या संपादकाचा आज विधानसभेत आ.जितेंद्र आव्हाड यांच्या सहित सर्व पक्षीय आमदारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

Dec 18, 2014, 06:47 PM IST

जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन अखेर मागे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे.  आक्षेपार्ह विधान केल्यामुळे  जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले होते.

Dec 15, 2014, 08:00 PM IST