maharashtra sadan

मलिकांना न हटविल्यास रस्त्यावर उतरू - सेना, काँग्रेसवर भाजपची टीका

महाराष्ट्र सदन नित्कृष्ट जेवण प्रकरणी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिलाय. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.

Jul 26, 2014, 07:38 PM IST

महाराष्ट्र सदनातील सुविधांबाबत चौकशी : सीएम

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील उपाहारगृह आणि सोयी-सुविधासंदर्भात शिवसेना खासदारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

Jul 23, 2014, 06:42 PM IST

महाराष्ट्र सदनात मला सुद्धा जेवणाचा वाईट अनुभव - दलवाई

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकार निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर महाराष्ट्र सदनात खरोखरंच गैरसोयी असून त्यावर तातडीनं उपाय योजायला हवेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय. 

Jul 23, 2014, 05:03 PM IST

महाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. 

Jul 23, 2014, 03:48 PM IST

महाराष्ट्र सदन आरोप चुकीचे - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सदन वादाप्रकरणातले शिवसेनेच्या खासदारांवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. शिवसेनेनं कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून आंदोलन करत असल्यामुळेच हा कांगावा केला जात असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

Jul 23, 2014, 03:40 PM IST

शिवसेनेचा दिल्लीत आवाज, महाराष्ट्र सदनला सुरक्षा

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील कॅंटीग वाद चांगलाच फेटला. शिवसेनेने आंदोलन करीत चांगलाच दणका दिला. त्यानंतर व्यवस्थापन ताळ्यावर आले. पुन्हा कॅंटीन सुरु करण्याचे आश्वास देण्यात आलेय.

Jul 22, 2014, 09:29 PM IST

शिवसेना खासदारांचं महाराष्ट्र सदनात आंदोलन

(रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं. 

Jul 17, 2014, 06:18 PM IST