आजच्या दिवशी नवम पंचम योग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी तयार होत असलेला शुभ योग मेष, कर्क, तूळ यासह इतर 5 राशींना लाभदायक ठरेल. या राशींना मंगळवारचा दिवस करिअरच्या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील आणि नातेवाईकांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी 19 नोव्हेंबरचा दिवस लाभदायक असणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल, त्यामुळे ते जे काही काम करतील, ते नव्या उमेदीने आणि उत्साहाने करतील. गुंतवणुकीसाठी उद्याचा दिवस चांगला असेल, भविष्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नियोजन केल्यास या राशीचे व्यापारी उद्या चांगला नफा मिळवू शकतील आणि व्यवसायाशी संबंधित लोकांशी संपर्क प्रस्थापित करतील.
वृषभ
आजच्या दिवशी रखडलेली जुनी कामे पूर्ण होतील. आपल्या कामांप्रती थोडं अलर्ट राहून ती पूर्ण होतात की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही सर्वोत्तम व्यक्तीमत्त्वाची भेट होईल. वैवाहिक जीवनात असलेल्या समस्यांपासून सुटका मिळेल.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांची वाढ तुमची आर्थिक स्थिती अस्थिर करू शकते.
कर्क
राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाल्यास ती लगेच फॉरवर्ड करू नका. तुमच्या प्रियजनांच्या भेटीमुळे काही कौटुंबिक समस्यांचे निराकरण कराल. तुमच्या मनात चांगले विचार ठेवावे लागतील.
सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुम्हाला काही समस्या येत असतील तर त्याही दूर होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचा एखादा विरोधक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार नफा मिळेल. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून आनंद होईल.
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा दिवस असेल. तुम्हाला तुमची दैनंदिन दिनचर्या चांगल्या प्रकारे सांभाळावी लागेल. सासरच्या बाजूने काही अडचण येत असेल तर तीही सोडवली जाईल. तुमची नेतृत्व क्षमता वाढेल आणि तुम्हाला सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या शहाणपणाचा आणि विवेकाचा वापर करण्याचा दिवस असेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार ठेवण्याची गरज नाही. तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होतील. नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. प्रेममय जीवन जगणाऱ्यांच्या मनात आनंदाची फुले उमलतील.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मनात नकारात्मक विचार ठेवणे टाळावे लागेल. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल.
धनु
आजचा दिवस तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून मुक्ती देईल. अनपेक्षित लाभ मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. जर तुम्हाला पैशांबाबत काही समस्या येत असतील तर त्याही दूर केल्या जातील. तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.
मकर
आजचा दिवस तुमच्या कला कौशल्यात सुधारणा घडवून आणेल. तुमच्या पात्रतेनुसार काम मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे लागेल. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होत असेल तर तेही दूर होईल.
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यात सभ्यता ठेवावी, अन्यथा तुमच्यात विनाकारण मारामारी होऊ शकते. कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला आवश्यक आहे, कारण ते तुम्हाला काही चांगला सल्ला देऊ शकतात.
मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी धोरणात्मकपणे काम करावे लागेल. सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर काही काळ पुढे ढकला, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आपल्या कामात थोडे लक्ष द्यावे लागेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)