बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि मलायका अरोराचे 'छैया छैया' हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाले होते. आजही या गाण्याचे लाखो चाहते आहेत. या गाण्यामधील शाहरुख खान आणि मलायकाचा डान्स देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. 1998 साली शाहरुख खानचा 'दिल से' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'छैया छैया' हे गाणे खूप गाजले होते. पण या गाण्यासाठी पहिली पसंती मलायका नाही तर या अभिनेत्रीला होती.
नुकताच फराह खान यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. फराह खान स्वतःला बिग बॉसची सर्वात मोठी फॅन म्हणते. जेव्हा जेव्हा सलमान खान वीकेंड का वारमधून गायब दिसतो तेव्हा फराह खान त्याच्या जागी शो सांभाळताना दिसते. फराह बिग बॉस 18 मध्येही दिसली होती. ती वीकेंड का वारमध्ये आली आणि तिने या शोचा विजेता करणवीर मेहरा याच्या खेळाचे कौतुक देखील केले. आता हा शो संपला असताना करणवीर आणि फराह एकत्र दिसले.
'छैया छैया'साठी पहिली पसंत ही अभिनेत्री
फराह खान सध्या व्लॉग देखील बनवते. नुकताच तिच्या व्लॉगमध्ये करणवीर मेहरा दिसला होता. यादरम्यान दोघांमधील संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फराह खानने करणवीर मेहराला सांगितले की,तिला मलायका अरोराऐवजी शिल्पा शिरोडकरला 'छैया छैया' गाण्यामध्ये कास्ट करायचे होते. मी 'छैया छैया'साठी शिल्पाला भेटण्यासाठी देखील गेली होती. पण तिच्या बाबतीत काहीतरी घडले असेल, कारण त्यावेळी तिचे वजन किमान 100 किलो होते. मग मी विचार केला की ती ट्रेन मध्ये कशी चढेल? ती चढली तर शाहरुख कुठे उभा राहणार?
हे ऐकताच करणवीर मेहरा गमतीने म्हणाला की, जर शिल्पा शिरोडकर ट्रेनमध्ये चढली असती तर तिला कोणत्याही बॅकअप डान्सरला कास्ट करण्याची गरज भासली नसती. त्याच व्लॉगमध्ये फराहने असेही सांगितले की, बिग बॉस 18 सीझनमध्ये करण तिचा आवडता स्पर्धक होता. कारण करणला स्वतःवर विनोद कसा घ्यायचा हे माहित आहे. जेव्हा फराह खान बिग बॉस 18 मध्ये आली होती तेव्हा तिने करणवीरचे कौतुक केले होते. इतर तिने सर्वांचा क्लास घेतला होता.