सूरज बडजात्या यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'मैंने प्यार किया' होता. याच चित्रपटातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर 'हम आपके है कौन' हा चित्रपट त्यांनी केला. हा चित्रपट देखील यशस्वी ठरला. सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'हम आपके है कौन' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे हे कलाकार दिसले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरज बड़जात्या यांना लोक फोन करून लग्नाचा योग्य मुहूर्त कोणता असे विचारायचे.
या चित्रपटात लग्नाच्या परंपरा आणि विधी दाखवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या वेळीचा किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या यशानंतर लोक मला फोन करून लग्नाच्या मुहूर्ताबद्दल विचारायचे.
Digital Commentary ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सूरज बडजात्या यांनी 'हम आपके है कौन' चित्रपटाविषयी सांगितले. या चित्रपटाचे यश इतके जबरदस्त होते की लोक कधीकधी त्यांना त्यांच्या कौटुंबिक कार्यासाठी वेळ विचारण्यासाठी फोन करायचे.त्यावेळी मला असे फोन येऊ लागले की लोक मला लग्नाच्या शुभ मुहूर्ताबद्दल विचारायचे. आजही मी लग्नाला गेल्यावर लोक माझ्याकडे असे पाहतात की, हार कोण घालणार? मुलगी की मुलगा? मला आश्चर्य वाटते की मला कसे कळेल? मला या गोष्टी खूप मजेदार वाटतात तर कधीकधी खूप लाजिरवाण्या देखील वाटतात. त्यासोबत गीतकार देखील मला फोन करून या कार्यक्रमासाठी गाणे द्यायला सांगायचे.
सुरुवातिला चित्रपट प्रेक्षकांना आवडला नव्हता
ते पुढे म्हणाले की, 'हम आपके है कौन' चित्रपटाला सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांकडून बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.परंतु, काही दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला.चित्रपटाच्या पहिल्या 5 दिवसांत मला लोकांकडून चित्रपटाबद्दल कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. याचे एक कारण म्हणजे चित्रपटात जवळपास 14 गाणी होती. नंतर आम्ही 2.5 गाणी कमी केली आणि नंतर जोडली. हा एक संगीतमय चित्रपट होता आणि लोक त्यासाठी तयार नव्हते. सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' हा सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.