महाराष्ट्रातील सरपंचावर का आली साडी नेसून फिरण्याची वेळ?

Mangesh Sable:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  बजेट सादर करत असताना महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांने साडी घालून अनोखे आंदोलन केले. अर्थसंकल्पात जी योजना 100 टक्के यशस्वी करण्याची घोषमा अर्थमंत्र्यांनी केली त्याच योजनेची पोल खोल महाराष्ट्रातील या सरपंचाने केली.   

वनिता कांबळे | Updated: Feb 1, 2025, 05:37 PM IST
महाराष्ट्रातील सरपंचावर का आली साडी नेसून फिरण्याची वेळ?   title=

Jal Jeevan Mission Ground Reality in Maharashtra’s Rural Area: अनेक तरुण हे साडी नेसून किंवा महिलांसारखा पेहराव करुन सोशल मिडियावर व्हिडिओ बनवतात. मात्र, साडी नसलेल्या एका संरपंचाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सरंपचाने गंमत म्हणून नाही तर राज्यातील पाणी प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेण्यासाठी साडी नेसून अनोखे आंदोलन केले आहे. या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

मंगेश साबळे असे या सरंपाचाचे नाव आहे. मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावाचे सरपंच आहेत.  महिला वेशात  मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. 
गावाला पाणी मिळत नसल्याने गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत दाखल झाले. आम्हाला पाणी द्यावे अशी महिलांची मागणी आहे.  महिलांच्या जागी सरपंच मंगेश साबळे साडी घालून जिल्हा परिषद कार्यालय गाठले. महिला दोन ते लांब किमी पायपीट करुन पाणी आणतात. सरपंच मंगशे साबळे यांनी महिलांप्रामणे साडीच परिधान केली नाही तर ते डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन जिल्हा परिषदेत पोहचले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर सरपंच मंगशे साबळे यांनी आंदोलन केले. जल जीवन मिशनचे काम चार वर्षांपासून रखडलेले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. सरपंच मंगशे साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना निवेदन दिले. यावेळी  सरपंच मंगशे साबळे यांनी  जल जीवन मिशनच्या कामाची पोलखोल देखील केली. 

2020 -21 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत  गावासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. काम सुरु करण्यात आले. जमीनीत यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाइन टाकून चार वर्षे झाली. मात्र, अद्याप गावात पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. गावातील महिला अजूनही मैलोनमैल पाण्यासाठी पायपीट करत आहेत. गावातील महिलांच्या व्यथा ऐकून सरपंच मंगेश साबळे यांनी यावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. मंगेश साबळे यांनी थेट साडी नेसून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जल जीवन मिशन अंतर्गत, भारताच्या ग्रामीण भागातील 15 कोटी कुटुंबांना पिण्यायोग्य नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा 2028 पर्यंत विस्तार करण्याची घोषणा अर्थंमत्र्यांनी केली.