manohar joshi

मनसेला सुहास कांदेंचा रामराम, शिवसेनेत प्रवेश

नाशिकमधले मनसेचे माजी पदाधिकारी सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय... मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय... यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थितीत होते...

Nov 29, 2013, 01:49 PM IST

...तर नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे

माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरला आहे.

Nov 29, 2013, 01:27 PM IST

बाळासाहेबांना सेनेच्या `सरां`नीही वाहिली आदरांजली!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले. जोशी सरांनी जड अंत:करणाने बाळासाहेबांना मानवंदना वाहिली.

Nov 17, 2013, 02:56 PM IST

अखेर सरांनी घेतलं नमतं, पोहोचले ‘मातोश्री’वर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आज ‘मातोश्री’वर गेले होते. तिथं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्य़ाआधी जोशी यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं जोशी सरांनी भेटीनंतर स्पष्ट केलं. मात्र, ही भेट तब्बल तासभर चालल्यानं तर्कवितर्कांना वेग आला आहे.

Nov 3, 2013, 03:55 PM IST

सचिनचा शेवटचा `सामना` उद्धव जोशी सरांसोबत पाहणार?

सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना पाहाण्यासाठी शिवसेना नेते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे देखील वानखेडेवर जाणार आहेत.

Oct 24, 2013, 07:07 PM IST

मनोहर जोशी...विषयावर बोलण्याची ही वेळ नव्हे - उद्धव

मनोहर जोशींच्या पत्रावर बोलण्याची गरज नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगून जोशींच्या नाराजीवर उद्धव यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Oct 19, 2013, 08:19 AM IST

मी शिवसेना सोडणार नाही - मनोहर जोशी

मी नाराज नाही. मी शिवसेना सोडणार नाही. मी काही चूक केली नाही तर माफी मागणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ मनोहर जोशी यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केली.

Oct 18, 2013, 11:24 AM IST

राणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण

शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.

Oct 17, 2013, 01:37 PM IST

जोशींवर नियतीनंच सूड उगवलाय - छगन भुजबळ

प्रत्येक पद आपल्यालाच मिळावं, हा जोशींचा पहिल्यापासून हव्यास होता. नियतीनं जोशींवर सुड उगवलाय, असा भडीमार भुजबळांनी जोशींवर केलाय.

Oct 15, 2013, 07:51 PM IST

अपमान सहन करणं जोशींचा जन्मसिद्ध हक्क- राणेंचं टीकास्त्र

शिवसेनेतल्या मनोहर जोशी मानापमान नाट्यावर कधीकाळी शिवसैनिक असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केलाय. “पदांसाठी अपमान सहन करत राहणं हा जोशींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते सहन करत राहणारच, असा वार राणेंनी जोशींवर केला.”

Oct 15, 2013, 07:39 PM IST

मनोहर जोशींवर राणेंचा प्रहार, भुजबळांनीही केलं लक्ष्य!

“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.

Oct 15, 2013, 07:15 PM IST

राष्ट्रवादीला आला जोशी सरांचा पुळका!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशींसंदर्भात घडलेल्या अपमाननाट्यानंतर आता राष्ट्रवादीला जोशी सरांचा पुळका आलाय.

Oct 15, 2013, 04:17 PM IST

पक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करणा-या मनोहर जोशींना लेखी माफीनामा देण्याचा आदेश मनोहर जोशींनी धुडकावून लावला. मात्र, हा आदेश जोशी सरांनी धुडकावून लावल्यामुळेच त्यांच्यावर दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार होण्याची वेळ आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Oct 15, 2013, 12:44 PM IST

मनोहर जोशीं नॉट रिचेबल, पुढे काय ?

दसरा मेळाव्यातील अपमान नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं नॉट रिचेबल आहेत. कुठे गेलेत याचा पत्ता नाही. नाराज जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. ते सेनेला जय महाराष्ट्र करणार का, चाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.

Oct 15, 2013, 09:23 AM IST

नाराज जोशी सर कुठे गेले?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.

Oct 14, 2013, 07:28 PM IST