Lakaht Ek Aamcha Dada Adhokshaj Karhade : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सर्वांच्या आयुष्यात खळबळ माजवायला आला आहे पंटर पिंट्या उर्फ समीर निकम. ही भूमिका कोण साकारतयं तुम्हाला माहितीये का तर त्या अभिनेत्याचं नाव अधोक्षज कऱ्हाडे आहे. अधोक्षज कऱ्हाडे विषयी बोलायचं झालं तर हा लोकप्रिय मराठमोळा संकर्ष कऱ्हाडेचा भाऊ आहे. त्याच्याप्रमाणे अधोक्षज देखील एक उत्तम अभिनेता आहे.
अधोक्षज कऱ्हाडे त्याच्या या दोन्ही भूमिकांविषयी बोलताना म्हणाला, 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव आहे समीर निकम उर्फ पंटर पिंट्या, नावाप्रमाणे तो अगदीच पंटर आहे. लहानपणापासूनच तो चोरी, पाकीटमारी किंवा कागदपत्र गायब करणे असे छोटे गुन्हे करत आला आहे, आणि यासाठी त्याला अनेकदा जेलमध्ये ही रहावं लागलं आहे. पण तो सराईत गुंडांसारखा क्रूर, दुष्ट नाही. तो मनानं अगदी साधा भोळा, प्रामाणिक आहे पण परिस्थितीमुळे त्याला हा मार्ग स्वीकारावा लागलाय. जालिंदर निंबाळकर उर्फ डॅड्डी यांनी एका विशेष कामगिरीसाठी पिंट्याची जेलमधून सुटका केली आहे. शत्रूला तेजश्रीशी लग्न करायचे आहे, पण तेजश्रीला हे मान्य नाही म्हणून जालिंदरने पिंट्याला म्हणजेच समीर नाईकला उभं केलंय. समीरच लग्न तेजूशी ठरवलं जात. हे पात्र नकारात्मक किंवा साकारातमक आहे असं म्हणता येणार नाही कारण या भूमिकेच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत.'
मालिकेत निवड होण्याचं कारण त्याला काय वाटतं याविषयी सांगत अधोक्षज म्हणाला, 'याचं कारण झी मराठीची आणखीन एक मालिका कारणीभूत आहे असं मी म्हणेन, कारण 3-4 वर्षापूर्वी मी 'घेतला वसा टाकू नको' नावाची मालिका करत होतो. त्या मालिकेचा क्रिएटिव्ह डायरेक्टर, या मालिकेसाठी ही काम करत आहे. त्यानं माझं काम पाहिलं होतं. त्यानं माझं नाव सजेस्ट केलं. त्या दिवशी मी सासुरवाडीला कोल्हापूरला निघत होतो. तेव्हाच मला कॉल आला 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमध्ये एक नवीन भूमिका आहे तुला करायला आवडेल का? मी लगेच होकार दिला. महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शन करून बाहेर येताच माझी निवड झाल्याचा कॉल आला आणि आज रात्रीच तुला साताऱ्याला पोहचायचे आहे. मी रात्रीच प्रवास करून पोहचलो आणि त्याच रात्री माझी लुक टेस्ट झाली आणि दुसऱ्यादिवशी पासून माझं शूटही सुरु झालं.'
पुढे संकर्षणाला फोन केला याविषयी सांगत अधोक्षज म्हणाला, 'घरी आई-बाबा , संकर्षणला कॉल केला त्यांना या भूमिकेबद्दल सांगितले, ते म्हणाले मस्त होऊन जाऊ दे. पहिला दिवस जसा आनंदात आणि उत्साहात गेला तसेच पुढचे दिवसही जातील याची खात्री आहे. माझ्या अभिनय प्रवासाची सुरुवात 2015 पासून झाली आणि याचं श्रेयसुद्धा झी मराठीलाच जाईल. 2014-15 मध्ये 'अस्मिता' नावाची मालिका आली होती, त्या मालिकेमध्ये मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. झी मराठीशी एक वेगळंच नातं आहे. फक्त एक कलाकार म्हणूनच नाही तर निवेदक म्हणूनही मी झी मराठीचे बरेच प्रोमोशनल कार्यक्रम केले आहेत. त्याच्यामुळे खऱ्याअर्थाने झी मराठी माझी माय मराठी आहे. प्रेक्षकांना मी हेच सांगेन असंच प्रेम करत रहा, माझं काम बघत रहा , आशीर्वाद देत रहा आणि त्यासोबत सूचना ही देत जा, कारण त्या महत्वाच्या असतात. तेव्हा बघत रहा 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री 8.30 वा. फक्त आपल्या झी मराठीवर.