Tapovan Express: मुंबईहुन नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसचा अपघात होता होता टळला आहे.रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानाने हा अपघात टळला.तपोवन एक्स्प्रेस जालन्याहुन नांदेडकडे जात असताना सारवाडी जवळ एका ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे पटरीवर चढवला.
ट्रक आणि धावत्या रेल्वेत काही अंतर बाकी असतानाच अचानक रेल्वे चालकाने रेल्वे थांबवल्याने हा रेल्वे आणि ट्रकचा समोरा-समोर होणारा अपघात टळला. अर्ध्या तासाने ग्रामस्थांच्या मदतीने हा ट्रक बाजुला काढण्यात आला.
Jalna, Maharashtra: The Tapovan Express, traveling from Mumbai to Nanded, narrowly avoided a collision with a truck. The train driver swiftly halted the train, preventing a potential disaster pic.twitter.com/h1NAPdx8DR
— IANS (@ians_india) January 31, 2025
एम हुसेल हे या रेल्वेचे लोको पायलट होते. त्यांनी घटनेच प्रसंगावधान राखून रेल्वे थांबवली. रेल्वेतील प्रवासी खाली उतरले आणि त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.दरम्यान ट्रक रेल्वे पटरीखाली घेतल्यानं रेल्वे नांदेड कडे रवाना झाली.
घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात रेल्वे कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.