मराठीत `टाईमपास` सिनेमा `कमाई`चा नवा विक्रम गाठणार?
टाईमपास या सिनेमाने दिवसात साडेसहा कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामुळे मराठीत टाईमपास सिनेमा कमाईचा नवा विक्रम गाठेल, असं म्हटलं जात आहे.
Jan 7, 2014, 09:29 AM ISTगब्बर, `दगडू` नही डरेगा, `थ्रीडी शोले` के सामने लढेगा
मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे. `टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय.
Jan 4, 2014, 07:07 PM ISTएनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल
मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
Sep 5, 2013, 05:14 PM IST`लई भारी` - सलमान खान मराठी सिनेमात
गेल्या २० वर्षांहून जास्त काळ बॉलिवूड गाजवल्यावर आणि बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे रेकॉर्ड्स केल्यावर सलमान खान आता मराठी सिनेमा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या बातमीमुळे सलमान खानचे मराठी फॅन्स आनंदी झाले आहेत.
Aug 13, 2013, 05:10 PM ISTसतीश तारे यांना द्या श्रद्धांजली
आपल्या कसदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील सुजय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना आपली श्रद्धांजली द्या.
Jul 3, 2013, 12:48 PM ISTऊर्मिला मातोंडकरचा मराठीत जलवा
‘रंगिला’ या हिंदी या चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आता मराठीच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात बिबट्याचे जीवघेणे हल्ले होत आहे. यावर सुजय सुनील डहाके चित्रपट निर्मिती करीत आहे. त्यांच्या `आजोबा` या चित्रपटात ऊर्मिला काम करणार आहे.
May 26, 2013, 03:27 PM ISTजयप्रभा स्टुडिओसंदर्भात लता मंगेशकर यांना दिलासा
जयप्रभा स्टुडिओसंदर्भातल्या खटल्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी लता मंगेशकर यांची मालकी असलेल्या जयप्रभा स्टुडिओतील काही जमीन निवासी आणि इतर वापरासाठी खुली करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.
Feb 21, 2013, 05:43 PM ISTमी मांडवलीचे धंदे करत नाही- राज
ठाण्यात मराठी कलाकारांचा मराठमोळा थाट पाहायला मिळाला...निमित्त होतं मिफ्ता महोत्सवाच्या कलाकारांच्या दिंडीचं...महेश मांजरेकर आणि त्यांच्यासोबत मराठी कलाकारांचा जल्लोष इथे पाहायला मिळाला..ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात हा महोत्सवात राज ठाकरे यांच्या भाषणाने रंगत आणली.
Sep 9, 2012, 08:45 PM ISTकोल्हापूरकरांचा जय(प्रभा)
कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता. जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. चित्रपटसृष्टीचा हा मानबिंदू अखेर सुरक्षित राहिलाय.
Sep 9, 2012, 06:52 PM IST`जयप्रभा स्टुडिओ`ची अखेर विक्री
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.
Aug 25, 2012, 05:45 PM ISTमराठीत 'नो एंट्री'
बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करणारा नो एंट्री आता मराठीत अवतरतोय. मिलींद कवडे दिग्दर्शित करत असलेल्या ‘नो एंट्री- पुढे धोका आहे’ च्या या मराठमोळ्या व्हर्जनचा गोव्यात मुहूर्त पार पडला.
May 18, 2012, 01:33 PM ISTउद्या बॉक्स ऑफिसवर 'थ्रिलर्स'ची मेजवानी
या वीकेण्डला बॉक्सऑफीसवर थ्रिलरची मेजवानी पाहायला मिळणार आहे. महेश भट्ट निर्मित ‘ब्लड मनी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे तर ‘बंबू’ हा कॉमिक थ्रिलरदेखील भेटीला येत आहे.यासोबत ‘चिरगूट’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
Mar 29, 2012, 06:45 PM IST'अजंठा'ची भव्य प्रेमकहाणी
बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
Feb 15, 2012, 11:21 AM IST'सतरंगी रे' चा प्रीमिअर
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'सतरंगी रे' या रॉक बॅण्डवर आधारित मराठी सिनेमाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी सिनेमाच्या टीमसह मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटीही उपस्थित होते.
Feb 9, 2012, 11:06 AM ISTगूढ काही जीवघेणे...
अंकुश चौधरी
गूढकथा... एक वेगळाच प्रकार. एक वेगळाच अनुभव... काहीसा अद्भुत, घाबरवणारा.. पण, तरीही आवडणारा. आपल्याला भीतीचंही आकर्षण कसं काय असू शकतं? पण, तसं असतं खरं. त्यात एक गंमत असते. उत्सुकता असते.
Dec 26, 2011, 01:51 PM IST