navi mumbai

पनवेल येथे ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी

नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची  विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे. 

Dec 14, 2016, 08:38 PM IST

नवी मुंबई लैंगिक शोषणप्रकरणी मुख्याध्यापिकेला अटक

एमजीएम शाळेमधल्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. तसंच शाळा व्यवस्थापनानेही मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. 

Dec 13, 2016, 08:46 PM IST

अत्याचारानंतर विद्यार्थीनी गर्भवती, जीवे मारण्याचीही धमकी

सप्टेंबर महिन्यात पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेनं आरोपी शिक्षकाला पाठिशी घातल्याचा आरोप पालकांनी केलाय. 

Dec 11, 2016, 09:12 PM IST

तुकाराम मुंढेंकडून ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर

सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीनं ई-गव्हर्नंसचा प्रभावी वापर करण्यावर, नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष दिलंय. 

Dec 5, 2016, 11:16 PM IST

अनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे  नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Dec 4, 2016, 08:13 AM IST

चिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस

खारघर येथील पाळणाघरात चिमुकलीला अमानुष मारहाण केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पाळणाघरं आणि नर्सरींबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील पाळणाघरं आणि नर्सरींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 127 पाळणा घरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Dec 2, 2016, 03:33 PM IST

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलची शिवसेना, शेकापकडून तोडफोड

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इथल्या पाळणाघराची तोडफोड करण्यात आली. 

Nov 25, 2016, 02:14 PM IST

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालय कारवाईला नगरविकास खात्याची स्थगिती

नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करुन हॉस्पिटल बंद करण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे. पालिकेच्या या कारवाईला नगरविकास खात्याने स्थगिती दिलीय. 

Nov 23, 2016, 11:29 AM IST