नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद अधिवेशनात उमटणार
16 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत सुरू रहावं, यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या अधिवेशनात उमटणार, हे नक्की... कारण या बैठकीपूर्वीच काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरवली.
Nov 14, 2016, 10:53 PM ISTमुंबई मनपा निवडणूक : इच्छूक उमेदवारांच्या चिंता वाढल्या
पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा आता चलनात नसणार आहेत. याचा सर्वाधिक फटका बसणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणा-या इच्छूक उमेदवारांना. काळा पैसा ओतून निवडून येण्याची स्वप्ने बघणा-यांनी या निर्णयाचा धसकाच घेतलाय. त्यामुळं निवडणुकीसाठी जमा केलेल्या काळ्या पैशाचे करायचं काय, यापेक्षा काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीसाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न सध्या सर्वच राजकीय पक्षातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना पडतोय.
Nov 10, 2016, 08:49 PM IST