पिंपरीत टँकर माफिया सक्रिय
पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असतानाच लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उचलत पिंपरीत टँकर माफिया सक्रिय झालाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचंच या माफियाला अभय असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र टॅन्कर माफियांकडून होत असलेल्या लुटीमुळे नागरिक हैराण झालेत.
Apr 26, 2012, 10:51 PM ISTपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कौतुकास्पद पाऊल
नेहमीच वादात असणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मात्र यावेळी वादग्रस्त नव्हे तर चांगल्या निर्णयामुळे पालिकेची चर्चा होत आहे.
Apr 18, 2012, 10:18 PM ISTजगदीश शेट्टीच्या निवडीनंतर राष्ट्रवादीत हलचल
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगदीश शेट्टी यांची निवड झालीय. नवनाथ जगताप यांच्या माघारीने ही निवड बिनविरोध झाली. शेट्टी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या गटातले मानले जातात. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध असल्यानं निवडीत चुरस होण्याची शक्यता होती. मात्र जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं शेट्टी यांचा मार्ग सुकर झाला.
Apr 7, 2012, 11:19 PM ISTअतिक्रमण कारवाईला राजकीय रंग
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधा-यांनी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं भवितव्य धोक्यात आलंय. संरक्षण विभागाच्या हद्दीत येणाऱ्या जागेवरच महापालिकेनं हा प्रकल्प उभारलाय. त्यामुळे कोर्टानं पिंपरी महापालिकेला चांगलंच खडसावलंय.
Mar 29, 2012, 10:33 PM ISTअजित पवारांचा विरोधी पदावर डोळा
पिंपरी चिंचवड महापालिकेत१२८ जागांपैकी ८३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलेल्या राष्ट्रवादीचा महापौर होणार हे निश्चित झाल्यावर आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे
Mar 10, 2012, 09:23 PM ISTराष्ट्रवादीचे सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद
पुण्याचे महापौरपद चार जणांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याची शक्यता असल्याने सव्वा-सव्वा वर्षांची संधी देण्याची कल्पना पुढे आल्याची चर्चा आहे.
Mar 8, 2012, 08:32 PM ISTपिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलचा 'आगाऊ' प्रस्ताव
पिंपरी-चिंचवडमध्ये असलेलं य़शवंतराव चव्हाण हॉस्पिटल गरिबांसाठी मोठं वरदान ठरलं आहे. पण आता याच हॉस्पिटलमध्ये आगाऊ रक्कम भरल्याशिवाय इलाज नाही, असा अजब प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आलाय.
Feb 29, 2012, 05:45 PM ISTपिंपरीत राज्यपालांना चक्कर आली
राज्यपाल के. शंकर नारायणन चक्कर आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. इथल्या ‘केरला भवन’च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्यपाल आले होते.
Feb 23, 2012, 09:32 PM ISTकाँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय. पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यावर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप होत आहे.
Feb 23, 2012, 08:56 PM ISTरिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांची सभा रद्द झाली आहे. पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सांगता सभा होणार होती. तशी घोषणाही करण्यात आली.
Feb 15, 2012, 10:38 AM ISTनिवडणुकीसाठी 'जोडी तुझी-माझी' !
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या प्रेरणेतून झाल्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करते. पण त्यांच्याच पक्षातले स्थानिक नेते या निर्णयाचा उपयोग करत मनपा निवडणुकांचं तिकीट घरातच रहावं यासाठी कसे प्रयत्नशील आहेत.
Jan 22, 2012, 09:07 AM ISTशंकर महादेवन यांना 'आशा भोसले पुरस्कार'
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार शंकर महादेवन यांना प्रदान करण्यात आला. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते शंकर महादेवन यांना हा पुरस्कार देण्यात आला.
Dec 6, 2011, 03:14 AM ISTपिंपरी चिंचव़डमध्ये 'मुन्नाभाई एमडी'
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे अनेक मुन्नाभाई असल्याचं खासगीत सांगितलं जातं. सामान्य़ रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अशा मुन्नाभाईंना शोधण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 23, 2011, 10:13 AM ISTपक्षाची वाताहत रोखायला दादांनी कसली कंबर
पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच कंबर कसलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहत होत आहे. हे सगळं थांबवण्यासाठीच अजित पवार यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Nov 9, 2011, 01:12 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची 'अश्मयुगा'कडे वाटचाल
पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईनं अक्षरश: पातळी सोडली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्यातली राजकीय लढाई शिवराळ पातळीवर पोहचली आहे.
Nov 6, 2011, 09:47 AM IST