radhakrishna vikhe patil

विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Apr 17, 2017, 09:55 AM IST

'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'

शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. 

Apr 11, 2017, 11:53 AM IST

राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद रिटर्न गिफ्ट - अशोक विखे

विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. 

Mar 8, 2017, 08:47 PM IST

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद

जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्‍यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Feb 15, 2017, 05:39 PM IST