rain

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

Mar 12, 2023, 08:02 AM IST

Weather forecast Updates : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी, यावर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज

Weather forecast Updates : आगामी काळात देशात लक्षणीय दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. (Weather Updates) देशात यावर्षी अस्मानी संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात दुष्काळ (Drought ) पडेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने 'अल निनो'चा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस (Rain ) कमी पडून दुष्काळाचे सावट राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Mar 11, 2023, 07:24 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Mar 10, 2023, 08:45 AM IST

Farmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 03:30 PM IST

Ajit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार

 Ajit Pawar  on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.   एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 10:11 AM IST

पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण

Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain )  नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे.

Mar 7, 2023, 03:49 PM IST

Maharashtra Rain : अवकाळी पावसाने झोडपले, पिक भुईसपाट तर बळीराजा पुरता आर्थिक संकटात

Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे.नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

Mar 7, 2023, 03:07 PM IST

Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Mar 7, 2023, 10:50 AM IST
Dhule Nandurbar Farmers In Problem For Unseasonal Rain Crops Damage PT1M

Dhule Nandurbar : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पाऊस

Dhule Nandurbar Farmers In Problem For Unseasonal Rain Crops Damage

Mar 5, 2023, 06:20 PM IST

Weather Update : रात्री थंडी, दिवसा भयानक उष्णता त्यात आता पाऊस पडणार; हवामान खात्याचा अलर्ट

Weather Update : राज्यातील थंडीचा जोर कमी झाला आहे. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे रात्री थंडी आणि दिवसी गर्मी असे वातावरण आहेत. त्यातच आता पाऊस पडणार आहे. 

 

Mar 2, 2023, 06:54 PM IST