विक्रोळीत शिवसेना विरुद्ध आरपीआय !
शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे नेते महायुतीचे गोडवे गात असले तरी विक्रोळीत या महायुतीला भगदाड पडलं आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या आरपीआयनं थेट शिवसेनेसमोरच आरपीआयचा उमेदवार उभा केला आहे.
Feb 4, 2012, 10:25 PM IST'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही'
मुंबई महापालिका निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरतानाच सर्व पक्षांना बंडखोरीनं ग्रासल आहे. मात्र रामदास आठवलेंच्या रिपब्लीकन पक्षाला निवडणूकीनंतरच्या बंडाची भिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुणी पक्षांतर करू नये यासाठी तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे.
Feb 2, 2012, 12:14 PM ISTतर महायुती तोडू – आरपीआय
पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.
Jan 29, 2012, 11:18 PM ISTनाशिकमध्ये युतीला भगदाड
नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.
Jan 26, 2012, 07:25 PM ISTमहायुतीची घोषणा अन् आठवलेंची चौफेर फटकेबाजी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.
Jan 13, 2012, 05:13 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM ISTआठवले घेरणार पंतप्रधानांना ?
इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.
Jan 7, 2012, 04:06 PM ISTRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ
आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.
Jan 6, 2012, 09:59 AM ISTRPI ला २५ जागा देण्यावर शिक्कामोर्तब
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Jan 5, 2012, 07:39 PM ISTमहायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार ?
शिवसेना, भाजपा आणि रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांच्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सेना आणि भाजपाने आठवलेंच्या रिपाईला २५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर रामदास आठवलेंनी ३० जागांची मागणी केली आहे.
Jan 5, 2012, 05:30 PM ISTनिवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात
जि.प. आणि नगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमामुळे आरपीआय गटाने विरोध करत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरपीआय गट आता या कार्यक्रमाविषयी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.
Jan 4, 2012, 01:39 PM ISTआरपीआय करणार आज रेलरोको
डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
Dec 19, 2011, 04:01 AM ISTआरपीआयचा 'राडा', इंदू मिलवर फिरवणार 'गाडा'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदूमिलची केवळ ४ एकर जागा देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात आज रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
Dec 15, 2011, 11:28 AM ISTआरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक
इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.
Dec 7, 2011, 02:17 PM ISTउद्या इंदू मिलमध्ये 'रिपाइं'चं आंदोलन
दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. इंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाईल.