shinde group

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाचे आमदार भिडले! भांडण मिटवण्यासाठी CM नागपूरातून थेट मुंबईत

Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत आल्याने आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने शिंदे गटातले आमदार आणि खासदार प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले आहे. हे भांडण सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींचा दौरा सोडून यावं लागलं आहे.

Jul 6, 2023, 09:01 AM IST

Shinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

Jul 1, 2023, 03:08 PM IST

केंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे?

Modi Government Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या तीन चेहऱ्यांना स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आले आहे.

Jun 30, 2023, 09:15 AM IST

आदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जुलैच्या ठाकरे गटाच्या मोर्चादिवशीच त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे. 

Jun 29, 2023, 09:03 PM IST

'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jun 20, 2023, 09:06 PM IST
Shinde Group Thackeray Group Shivesena Anniversary PT1M12S

'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.

Jun 19, 2023, 02:30 PM IST

यांचंही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. 

Jun 18, 2023, 11:09 AM IST

ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण

Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Jun 17, 2023, 09:35 AM IST