शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?... शिवसेनेचा!
आवाज कुणाचा... शिवसेनेचा... ही घोषणा पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनमध्ये घुमणार आहे. कारण शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलीय..
Oct 8, 2013, 06:37 PM ISTकोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.
Oct 5, 2013, 05:12 PM ISTकाँग्रेसलाही घ्यायचाय शिवाजी पार्कवर मेळावा!
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं शिवसेनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असताना, आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे.
Sep 27, 2013, 11:39 PM ISTन्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
Jul 16, 2013, 04:39 PM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`!
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बहुचर्चित स्मृती उद्यानाचा मुद्दा अखेर धसास लागलाय. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते.
Feb 6, 2013, 06:54 PM ISTचौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आज बाळासाहेबांच्या महानिर्वाणाला एक महिना पूर्ण होतोय.
Dec 17, 2012, 02:37 PM ISTशिवसेना आज चौथरा विधीवत हलविणार
बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.
Dec 17, 2012, 10:26 AM ISTसेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
Dec 14, 2012, 06:35 PM IST`स्मृतीस्थळा`वरुनही शिवसेनेची माघार
शिवसेनेनं एक पाऊल मागे येत समाधीस्थळाच्या जागेत किंचित बदल करण्याची तयारी दर्शवलीय. मात्र समाधीस्थळ शिवाजी पार्कवरच राहिल असे संकेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. शिवसेनेच्या घसरलेल्या ताकदीचा अंदाजही यानिमित्तानं आलाय.
Dec 13, 2012, 06:02 PM ISTशिवसैनिकांचा पहारा!
बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यविधी झाले, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांचं तात्पुरतं स्मारक उभं केलं. मात्र त्यानंतर या स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जातोय. 24 तास शिवसैनिकांचा खडा पहारा तिथं आहे. यातून शिवसेना नेमकं काय साध्य करणार, हा पहारा तरी किती काळ देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.
Dec 12, 2012, 11:35 PM ISTशिवसेनेचं एक पाऊल मागे!
शिवाजी पार्कच्या नामांतरावरून शिवसेनेनं अखेर माघार घेतलीय. शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांच्या सृमीस्थळाला शिवतीर्थ नाव देण्याची नवी मागणी आता शिवेसेनेनं केली आहे. याबाबत महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी माहिती दिलीय.
Dec 12, 2012, 08:11 PM ISTअबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
Dec 11, 2012, 03:56 PM ISTशिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.
Dec 11, 2012, 10:57 AM ISTलष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2012, 10:11 AM ISTशिवाजी पार्कच्या नामांतराला मनसेचा विरोध
दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचे नामांतर करून शिवतीर्थ करण्यात यावे, या शिवसेनेच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने या नामांतरासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
Dec 10, 2012, 08:17 PM IST