खासदार रवींद्र गायकवाडांचा माफी मागण्यास नकार
खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट आणि गोएअर या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. गायकवाड यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. आधी त्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग बघू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Mar 24, 2017, 11:11 AM ISTशिवसेना खासदाराची एअरइंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:37 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाड वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:34 PM ISTसर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीवर सेनेच्या खासदारांचा बहिष्कार
३१ तारखेला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा केल्यावर पण या बैठकीला यंदा मात्र विशेष महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सर्वपक्षीय खासदार उपस्थित राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना आणि भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने येणार होते.
Jan 27, 2017, 12:10 PM ISTसनबर्न पार्टीवरून शिवसेनेच्या स्थानिक खासदारांचा गौप्यस्फोट
केसनंद गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीवरून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण या पार्टीसाठी सरकारनंच पायघड्या घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
Dec 27, 2016, 07:31 PM ISTशिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मोदींची भेट, पण ठोस आश्वासन नाही
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली खरी पण त्याच्या हाती कुठलंही ठोस आश्वासन आलेलं नाही.
Nov 22, 2016, 01:33 PM ISTशिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक
दिल्लीत उद्या सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.
Nov 15, 2016, 05:58 PM ISTभाजपने शिवसेनेला पुन्हा डावलले
शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आलाय. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण दिलेच नव्हते, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेय.
Mar 2, 2016, 09:19 AM IST