suresh prabhu

कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला!

कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

Jun 11, 2015, 10:00 PM IST

ऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत धावणार एसी लोकल- रेल्वेमंत्री

नुकताच पारा पुन्हा वाढायला लागलाय. मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी आणि उन्हामुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा प्रवास गार करण्यासाठी लवकरच मुंबईत एसी लोकल धावणार आहेत. ऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत एसी लोकल धावतील, असं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलंय. 

Apr 18, 2015, 06:47 PM IST

रेल्वेची भाडेवाढ, प्लॅटफॉर्म तिकीट महागले

रेल्वेने सामान्यांना दिलासा देताना तिकिट वाढ केली नव्हती. मात्र, आता सेवाकरानंतर प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. आता हे तिकिट १० रुपयांना मिळणार आहे.

Mar 18, 2015, 10:26 AM IST

रेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू

रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Mar 14, 2015, 07:16 PM IST

‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?

रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.

Feb 27, 2015, 10:43 AM IST

'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद

 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्‍वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

Feb 27, 2015, 07:16 AM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 09:29 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : कोकणवासियांच्या प्रतिक्रिया...

कोकणवासियांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 08:37 PM IST