surgical strike

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली

होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय. 

Oct 5, 2016, 09:03 PM IST

'...जो युद्ध करेल त्यांना सोडणार नाही - वेंकैया नायडू

केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.

Oct 5, 2016, 02:02 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.

Oct 5, 2016, 10:21 AM IST

'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'

लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Oct 5, 2016, 09:05 AM IST

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

Oct 4, 2016, 05:26 PM IST

'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'

'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'

Oct 4, 2016, 05:25 PM IST

सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या जवानांना भेटणार पंतप्रधान मोदी ?

पीओकेमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार

Oct 4, 2016, 05:09 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवर पहिल्यांदा बोलले हवाईदलाचे प्रमुख

पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर एयरफोर्स प्रमुख अरूप राहा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राहा यांनी म्हटलं आहे की, सर्जिकल स्ट्राइक हे खूपच संवेदनशील प्रकरण आहे, यावरर नाही बोलणार.'

Oct 4, 2016, 01:59 PM IST

राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा

राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. 

Oct 3, 2016, 08:39 PM IST

100 मुद्द्यांवर आमचे मतभेद, तरी मोदींना सॅल्युट

माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 100 मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण भारतानं पाकव्याप्त काश्मीरवर जो सर्जिकल स्ट्राईक करण्याची इच्छाशक्ती दाखवली त्याबद्दल मी मोदींना सॅल्युट करतो

Oct 3, 2016, 05:51 PM IST

प्रत्येक पाकिस्तानी शहीद व्हायला तयार, मियादाद बरळला

 शाहीद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादाद भारताबद्दल बरळला आहे.

Oct 3, 2016, 05:16 PM IST

चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न

अनावधानानं नियंत्रण रेषेपलिकडे गेलेला जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारतानं वेगवान प्रयत्न सुरू केलेते. आज भारताच्या लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत केलीय. 

Oct 3, 2016, 01:54 PM IST

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसलीये. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केलीय. 

Oct 3, 2016, 08:08 AM IST

'भारत जमिनीसाठी भुकेला नाही'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल ऑपरेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे.

Oct 2, 2016, 03:57 PM IST