terror

सोमनाथ मंदिरावरील अतिरेकी हल्ला उधळला, १० पैकी ३ पाक दशहतवाद्यांचा खात्मा

देशात महाशिवरात्री उत्सावादरम्यान सोमनाथ मंदिरासह अनेक मंदिरांवर हल्ला करण्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावलाय. पाकिस्तानच्या १० पैकी ३ दहशतवाद्यांचा भारतात प्रवेश करताना गुजरात सिमेबाहेर खात्मा करण्यात आला, अशी माहिती आज उघड झालेय.

Mar 15, 2016, 07:08 PM IST

VIDEO : अशी आहे क्रूर आयएसची 'टेरर वेपन लॅब'!

अत्यंत क्रूर अशी दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'नं (आयएस) अनेक वैज्ञानिक आणि शस्त्र तज्ज्ञांना आपल्या हाताशी घरलंय. 

Jan 8, 2016, 01:50 PM IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू 

Jan 6, 2016, 03:29 PM IST

दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय. 

Jan 5, 2016, 03:45 PM IST

महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!

सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

Nov 27, 2015, 01:18 PM IST

'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...

मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब  पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.

Nov 26, 2015, 01:38 PM IST

२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता

मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?

Nov 26, 2015, 08:44 AM IST

रेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट

उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.

Oct 15, 2015, 05:38 PM IST

मुंबईत तीन दहशवादी फिरतायेत, पोलिसांनी स्केच केले जारी

 देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. ३ संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती आहे. हे दहशतवादी मुंबईत फिरत आहेत. याबाबत दोघांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने घातपात होण्याची शक्यता वर्तविली असून राज्यांना अलर्ट जारी केलाय.

Oct 13, 2015, 09:16 AM IST

मुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?

मुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?

Oct 2, 2015, 11:13 AM IST

पाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.

Oct 1, 2015, 09:44 AM IST