AC Bed Sheet!अंथरुणावर पडताच तुम्हाला एसीसारखा मिळेल थंडावा; जाणून घ्या नव्या चादरीबद्दल

उन्हाळ्यात उकाड्यामुळे जीव नकोसा होतो. घरी असलो तरी पंख्याची गरम हवा घामाचा धारा थांबवत नाही.

Updated: Jul 4, 2022, 08:25 PM IST
AC Bed Sheet!अंथरुणावर पडताच तुम्हाला एसीसारखा मिळेल थंडावा; जाणून घ्या नव्या चादरीबद्दल title=

AC Bed Sheet: उन्हाळ्यात उकाड्यामुळे जीव नकोसा होतो. घरी असलो तरी पंख्याची गरम हवा घामाचा धारा थांबवत नाही. त्यामुळे अनेक जण घरात एसी-कूलर वापरतात. मात्र उन्हाळा येताच एसी-कुलरचे भावही गगनाला भिडतात. अनेकांना एसी खरेदी करणं परवडत नाही. खरेदी केली तरी नंतर येणारे वाढीब वीज बिल त्रासदायक असते. आज आम्ही उकाड्यापासून थंडावा देणाऱ्या चादरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ही चादर बिछान्यावर अंथरल्यानंतर त्यावर झोपल्यास थंडावा देते. जाणून घेऊयात कशी आहे एसी बेडशीट...

अ‍ॅमेझॉनवर परवडणारी बेड शीट

या बेड शीटला कूलिंग जेल मेट्रेस म्हणतात. ही बेड शीट ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे. ही मॅट्रेस अ‍ॅमेझॉनवर कमी किमतीत खरेदी करता येईल. याची किंमत 1500 रुपये असली तरी अ‍ॅमेझॉनवर 699 रुपयांना उपलब्ध आहे. बेडशीटवर मोठी सवलत आहे.

थंड हवा कशी देणार?

तुम्ही विचार करत असाल की ही चादर थंड हवा कशी देऊ शकते? यामध्ये जेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सॉकेटमध्ये लागू होताच ते काही मिनिटांत शीट थंड करते. त्याचबरोबर वायब्रेट होत नाही आणि सायलेंटपणे काम करते.

कोरड्या कापडाने स्वच्छ करावी लागणार

जर ही बेड शीट अस्वच्छ झाल्यास ती कोरड्या कापडाने स्वच्छ करावी लागेल. तुम्ही ओले कापड वापरल्यास, शीट खराब होऊ शकते आणि थंडावा मिळणार नाही. त्यामुळे बेड शीट स्वच्छ करण्यासाठी फक्त कोरडा कपडा वापरावा. ही चादर बहुतेक उन्हाळ्यात वापरली जाते. पण जर तुम्हाला जास्त उष्णता जाणवत असेल आणि पंखा लावून झोपत असाल तर ही चादर तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. शीट इतका थंडवा देते की आपल्याला ब्लँकेटची गरज भासू शकते.