Airtel चा हा जबरदस्त सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहित आहे का? मिळणार जास्त फायदा

Airtel ची नवीन ऑफर, रिचार्जवर मिळणार 50 रुपयांची सूट

Updated: Dec 29, 2021, 07:57 PM IST
Airtel चा हा जबरदस्त सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहित आहे का? मिळणार जास्त फायदा title=

मुंबई: सर्व कंपन्यांनी आपले प्लॅन वाढवले असताना एक कंपनीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.या कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. एअरटेल कंपनीने जिओ, वोडाफोन ग्राहकांना टफ फाईट देण्यासाठी खास स्किम आणली आहे. एअरटेल कंपनी आपले नवे प्लॅन नव्या वर्षात लागू करणार आहे. 

ग्राहकही आता स्वस्त योजना शोधत आहेत. त्यामुळे त्यांना एअरटेल कंपनीचा फायदा होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्हीही महागड्या प्लॅन्समुळे हैराण असाल तर तुमच्यासाठी ही चांगली सेवा आहे. कारण एअरटेल कंपनी 50 रुपयांचा डिस्काऊंट देणार आहे. 

डिसेंबरच्या सुरुवातीला, Airtel, Jio आणि Vodafone Idea ने त्यांचे सर्व प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं आपल्या काही प्रीपेड प्लॅनवर 50 रुपयांची सूट देत आहे. 

ही सवलत सर्व Airtel Thanks ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. अॅपद्वारे एअरटेल थँक्स पर्यायावर जाऊन तुम्ही 50 रुपयांची सूट मिळवू शकता. एअरटेल कंपनी 359 आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर ही सुविधा देत आहे. 

359 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 GB डेटा 100 SMS अनलिमिटेड कॉल आणि 2 GB डेटा कुपन मिळणार आहे. जर तुम्ही थँक्स अॅपवरून रिचार्ज केला तर 50 रुपये सूट मिळणार आहे. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3GB डेटा, 100 SMS अनलिमिटेड कॉल डिस्ने + हॉटस्टारसह 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे.