मुंबई : भारतात नुकताच मायक्रोमॅक्सने भारत ५ हा मोबाईल फोन लॉन्च केला आहे. ५५५५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार्या या फोनच्या सोबतीला अनेक आकर्षक ऑफर आहेत.
व्होडाफोन भारत ५ कन्झ्युमर्सना ५० जीबी फ्री डाटा देणार आहे. तसेच पुढील पाच महिने ग्राहकांना १० जीबी डाटा मिळणार मिळणार आहे.
व्होडाफोन इंडियाने ग्राहकांसाठी खास कॅश बॅक ऑफर देणार आहेत. ही ओफर मायक्रोमॅक्सच्या ४ जी स्मार्ट फोनसाठी राहणार आहे.
व्होडाफोनचे ग्राहकदेखील त्यांच्या खास ऑफरचा वापर करून मायाक्रोमॅक्सचे नवे स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहेत. यामध्ये भारत २ प्लस, भारत ३. भारत ४ आणि कॅन्व्हस १ या फोनचा समावेश आहे. तसेच तुम्हांला कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.
ग्राहकांना ही ऑफर घ्यायची असल्यास दर महिना १५० रूपये रिचार्ज करावे लागतील. हा रिचार्ज ३६ महिने करावे लागेल.
१८ व्या महिन्याच्या शेवटी तुम्हांला ९०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पुढील १८ महिन्यांसाठी १३०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे एकुण २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
व्होडाफोनच्या एम पैसा वॉलेटमध्ये हे पैसे मिळतील.