मुंबई : भारतात सध्या अनेक इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या आहेत. यापैकी आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध रिलायन्स जिओफायबर आहे. JioFiber फार कमी वेळात भारतात लोकप्रिय झाले आहे. तुम्हीही हायस्पीड डेटा मिळवण्यासाठी JioFiber चा प्लॅन घेण्याच्या विचारात असाल. तर तुम्हाला स्वस्त प्लॅन विषयी सांगणार आहोत.
नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला तुमच्या घरात जिओफायबर इंस्टॉल करायचे असेल तर, 500 रुपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे.
ग्राहकांसाठी जिओफायबरचा 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 30 mbps स्पीड ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनसाठी तुम्हाला 30 दिवसांची वैधता उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहक कोणत्याही अडचणींशिवाय हायस्पीड इंटरनेट आरामात चालवू शकतात.
तुम्हाला इंटरनेटच्या स्पीड आणि अन्य सुविधांबाबत ट्रायल घ्यायची असेल तर, कंपनीकडून 30 दिवसांची फ्री चाचणी मिळत आहे. त्यानंतर कनेक्शन सुरू ठेवायची की बंद करायाचे हे तुम्ही ठरवू शकता.
फ्री चाचणीसाठी काही नियम आणि अटी आहेत ज्या तुम्ही कंपनीच्या साइटवर पाहू शकता.