मुंबई :5G सेवा स्मार्टफोनमधील एक महत्त्वाचे फिचर आहे. ज्याच्या नावाखाली स्मार्टफोन कंपन्या वर्ष 2021 मध्ये बरेच फोन विकत आहेत. अशा परिस्थितीत आता अधिकाधिक लोकांना 5G तंत्रज्ञान भारतात सुरु झाल्याची स्वप्न पडू लागलेयत. तुम्हाला देखील असं स्वप्न पडलं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण प्रत्यक्षात असं काही नाही. आतापर्यंत बर्याच मोबाईल कंपन्यांनी कमी किंमतीत 5G फोनच्या नावाखाली मोठा गल्ला जमवला. पण प्रत्यक्षात 5G तंत्रज्ञान हे भारतात आलंच नाहीय.
मीडियाटेक आणि क्वालकॉम अत्यंत कमी किंमतीत 5G चिप्स बनवत आहेत. भारतात लॉन्च करण्यात आलेल्या 5G स्मार्टफोनमध्ये रियलमे नरजो 30 प्रो, रियलमी एक्स 7 आणि मी 10i चा समावेश आहे. तंत्रज्ञान आलं नसेल तर तुम्ही हा फोन खरेदी करताय? असा प्रश्न स्वत: ला विचारा.
रिलायन्स जिओ, एअरटेलने जाहीर केले आहे की कंपनी 2021 च्या मध्यापर्यंत 5 जी सेवा सुरू होऊ शकते. असे असले तरी सध्या भारतात 5 जी सेवा नाहीय. भारतात सध्या उपलब्ध मोबाइल नेटवर्क 800, 900, 1800, 2300 आणि 2700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम वापरतात. हे स्मार्टफोन 4 जी नेटवर्कसाठी सर्वोत्कृष्ट आहेत परंतु अद्याप 5 जी साठी त्याचा वापर झाला नाहीय. ही सेवा भारतात कधी सुरु होईल याबद्दल माहिती नाहीय.
गेल्या 2 वर्षात 5 जी फारसे काम झालेले नाही. अशा परिस्थितीत, आम्हाला या नेटवर्कसाठी अधिक वाट पाहावी लागणार आहे. 4 जी लाँचिंग आठवत असेल, तर तुमच्या लक्षात येईल की हे नेटवर्क सुरुवातीला काही राज्यांमध्येच उपलब्ध होते आणि इतर भागात येण्यास बराच वेळ लागला.
काही खेड्यांमध्ये अद्याप 4G कव्हरेज मिळत नाही. 5G एक पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान आहे आणि देशात त्याची मुळे स्थापित करण्यास अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच 5G स्मार्टफोन विकत घेतल्यास पुढील दोन किंवा तीन वर्ष आपल्यासाठी काही उपयोग होणार नाही.
जर तुम्ही स्वस्त किंमतीत मिळतोय म्हणून 5G फोन विकत घेतला तर काही काळानंतर तो खूपच जुना होईल आणि नंतर त्याचे फिचर्स देखील जुने होतील. कारण तंत्रज्ञान प्रत्येक नवीन दिवशी अपग्रेड होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला 5G फोनचा उत्तम प्रकारे वापर करायचा असेल तर पुढील 2 ते 3 वर्षात तुम्ही 5G फोन खरेदी करावा. जेणेकरून हे नेटवर्क वापरताना आपल्याकडे चांगला फोन असेल.
कोणतीही कंपनी आपल्या फोनमध्ये 5G देते तर कमी प्रोसेसरचा वापर करेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना कमी प्रतीची कॅमेरा सेन्सर आणि छोटी बॅटरी मिळेल. अशा परिस्थितीत, आपण 5G फोनच्या मागे असाल तर आपण 4 Gची फोन निवडा. 5Gच्या नावाखाली तुमच्या माथी कमी फीचर वाला फोन घातला जाणार नाही याची काळजी घ्या.