Twitter Monetization: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युबच्या माध्यमातून कमाई करता येते हे तर तुम्हाला माहितीच असेल पण आता ट्विटरही (Twitter) तुम्हाली ही संधी देणार आहे. ट्विटरने त्यांच्या कंटेट क्रिएटर्ससाठी मोनोटायजेशन (Twitter Monetization) फिचर सुरु केले आहे. म्हणजेच आता ट्विटरवरुन तुम्ही फोटो आणि व्हिडिओ किंवा पोस्ट करत असाल तर त्यातून तुम्हाला कमाई करण्याची संधी आहे. इतकंच, नव्हे तर त्यासाठी तुमचे 500 फॉलोअर्स असतील तरीदेखील तुम्ही मॉनिटाइजेशनसाठी अप्लाय करु शकणार आहात. सविस्तर जाणून घेऊया या प्रक्रियेविषयी. (Twitter's Creator Monetization)
ट्विटर सब्सक्रिप्शनसाठी तेच लोक पात्र आहेत ज्यांनी ट्विटर ब्लू टिक सब्सक्रिप्शन घेतले आहे. डेस्कटॉपसाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनची किंमत 900 रुपये आहे. तर, मोबाईलसाठी 650 रुपये प्रतिमहिना मोजावे लागणार आहेत. जर तुमचे ट्विटरवर 500 फॉलोअर्स असतील तरीदेखील तुम्ही अप्लाय करु शकता. मात्र, 500 फॉलोअर्ससोबत तुमचे ट्विटरवर मागील तीन महिन्यात कमीत कमी 15 मिलियन इंप्रेशन असावे लागतील. जर तुम्हीदेखील ही अट मान्य केलीत तर तुम्हीदेखील ट्विटर कंटेट मोनेटाइजेशन प्रोगॅमसोबत जोडू शकता. यातून तुम्ही 50 डॉलर (4000 रुपये) इतकी कमाई करुन शकता.
ट्विटर मोनेटायजेशन प्रोग्रामसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ट्विटर अकाउंट सेटिंगमध्ये जावे लागेल
त्यानंतर Account पर्यायाच्या खाली असलेल्या मोनेटायझेजन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला सब्सक्रिप्शन आणि अॅड रेव्हेन्यू शेअरिंगचे ऑप्शन मिळेल.
त्यानंतर दोन्ही ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्या पोस्ट आणि व्हिडिओसाठी अॅड दिसेल. त्याहिशोबाने तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आत्तापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो ( Linda Yaccarino) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एलन मस्कने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) आणि नाव बदलण्यात (Twitter Rename) आले आहे. ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता तिच ओळख बदलण्यात आली आहे. आता ट्विटर X नावाने ओळखले जाणार आहे. तसा बदलही करण्यात आला आहे.