मुंबई : १ जानेवारीला मेड इन इंडिया स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. यात कुठलेली चीनी पार्ट वापरलेले नाहीत. फेसचेन FESSChain ही स्वदेशी कंपनी चीनी कंपन्यांना टक्कर द्यायला सज्ज आहे. तर या फोनला 'लोकल फॉर वोकल' योजनेतून बनवलंय. ५ ते १२ हजारापर्यंत याची किंमत असेल. या मोबाईलमध्ये काही बिघाड झालाच, तर तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही. कर्मचारी घरी येऊन हा मोबाईल दुरुस्त करून देतील. १ जानेवारीपासून हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
भारतीय टेक्नॉलॉजी फर्म FESSChain मागील काही दिवसात पहिल्या (BlockChain) ब्लॉकचेनच्या स्मार्टफोन सीरीजची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या InBlock सीरीजमध्ये तीन स्मार्टफोन्स भारतात लॉन्च केले आहेत. हा स्मार्टफोन भारतात बनलेला आहे, याची किंमत ४ हजार ९९९ पासून पुढे आहे. कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat)कॅम्पेननुसार या ब्लॉकचेनचे स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.
InBlock स्मार्टफोन सीरीजनुसार हा स्मार्टफोन Android OS वर आधारीत आहे. यात AI, ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, ऑटोफोकस कॅमरा फीचर्स पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन डिजिटल ट्रेडिंग, एक्सचेंज या वॉलेट्ससाठी वन-स्टॉप एक्सेस असणार आहे.
या पद्धतीने आपण कोणत्याही डिजिटल ट्रान्झॅक्शनला अधिक सुरक्षित ठेवू शकाल. कंपनीकडून शोकेस करण्यात आलेल्या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं, तर यातील बॅक पेंटा कॅमेरा आणि सेट-अप आणि एलईडी फ्लॅश दिसतो. तेथेच फ्रंट आणि पंच-होल डिस्प्ले पॅनल पाहायला मिळणार आहे.